आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

संभाजी महाराज बलिदान दिन; संभाजी महाराजांचा इतिहास शालेय अभ्यासक्रमात- तावडे

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

पुणे- छत्रपती संभाजी महाराज यांचे संघर्षमय जीवन प्रेरणा देणारे असून त्यांचा इतिहास शालेय अभ्यासक्रमात समाविष्ट करण्यात येईल. अभ्यास मंडळाला तशा सूचना देण्यात येतील, असे शिक्षणमंत्री विनाेद तावडे यांनी शनिवारी सांगितले. छत्रपती संभाजी महाराजांच्या ३२९व्या बलिदान स्मरणदिनानिमित्त अायाेजित कार्यक्रमात ते वढू-तुळापूर येथे बाेलत हाेते.


अभिनेते अमाेल काेल्हे, खासदार शिवाजी अाढळराव पाटील, अामदार बाबुराव पाचर्णे, वर्षा तावडे, तुळापूरचे सरपंच गणेश पुजारी या वेळी उपस्थित हाेते.  तावडे म्हणाले, वढू-तुळापूर विकास अाराखडा तयार करण्यात येणार असून लवकरच मुंबईत बैठक घेतली जाईल. त्याकरिता अावश्यक निधी उपलब्ध करून दिला जाईल. छत्रपती संभाजी महाराजांच्या समाधी स्थळी त्यांच्या जीवनचरित्राचे संग्रहालय अाणि पायाभूत साेयीसुविधांची निर्मिती करण्यावर भर देण्यात येणार असल्याचे सांगून वढू प्रमाणेच तूळापूर येथे शासकीय मानवंदना देण्यात यावी, असा प्रस्ताव मुख्यमंत्र्यांकडे पाठवला जाईल. पुढील वर्षीपासून तूळापूर येथे ही शासकीय वंदना सुरू करण्यात येर्इल, असेही तावडे म्हणाले. मराठा क्रांती माेर्चाच्या शिस्तबध्द माेर्चाद्वारे मराठा समाजाच्या मागण्या सरकार दरबारी पोहचवण्यात आल्या असून  त्याअनुषंगाने मंत्रिमडळाच्या बैठकीनंतर महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या अध्यक्षतेखाली माेर्चातील मागण्यांच्या पूर्ततेबाबत चर्चा केली जाते. 


बलिदान दिनाला उत्सवाचे स्वरुप नकाे

छत्रपती संभाजी महाराज मालिकेतील कलाकरांसह वढू येथील कार्यक्रमात सहभागी झालेला अभिनेता अमाेल काेल्हे म्हणाले, छत्रपती संभाजी महाराजांचे जीवन हे प्रेरणादायी असून त्यांच्या मृत्युनंतरही मुघलांना मराठ्यांचे राज्य मिळवता अाले नाही. या बलिदान दिनाला उत्सवाचे स्वरुप प्राप्त हाेणार नाही, याची दक्षता घ्यावी.

बातम्या आणखी आहेत...