आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

एकबोटेंना का अटक केली नाही?, विश्वास नांगरे-पाटीलांनी दिले हे उत्तर पाहा VIDEO

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

पुणे- मिलिंद एकबोटेंना पोलिस कोठडीत घेऊन, त्यांची चौकशी करायची आहे, असे कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलिस महानिरीक्षक विश्वास नांगरे-पाटील यांनी सांगितले. पिंपरी-चिंचवड येथे आयोजित पत्रकार परिषदेत मिलिंद एकबोटेंना अटक का केली नाही, असा प्रश्न विचारण्यात आल्यावर त्यांनी हे उत्तर दिले. 

 

 

काय म्हणाले विश्वास नांगरे-पाटील?

कोरेगाव भीमा येथे १ जानेवारी रोजी झालेल्या हिंसाचार प्रकरणी संभाजी भिडे आणि मिलिंद एकबोटे यांच्यावर दंगल घडवल्याचा आरोप आहे. मिलिंद एकबोटेना सर्वोच्च न्यायालयाने दिलासा दिला आहे. एकबोटे यांच्या जामीन अर्जावर आता पुढील सुनावणी 14 मार्च रोजी होणार आहे. त्यामुळे एकबोटेना दिलासा मिळाला आहे. मिलिंद एकबोटे यांना अटक का करण्यात आली नाही? असा प्रश्न सर्वोच्च न्यायालयाने महाराष्ट्र सरकारला विचारला होता. दरम्यान, पिंपरी-चिंचवड येथे आयोजित पत्रकार परिषदेत मिलिंद एकबोटेंना अटक का केली नाही, असा प्रश्न विश्वास नांगरे पाटील यांना पत्रकारांनी विचारला असता,ते म्हणाले, की मिलिंद एकबोटेंना आधीच दिलासा मिळाला होता.त्याअनुषंगाने आम्हाला पोलिस कोठडी घेऊन, चौकशी करायची आहे. फक्त अटक करुन जामीन मिळू द्यायचा नाही. त्यामुळे आमची कोठडीची मागणी आहे. त्यानुसार 14 मार्चला ताकदीनिशी न्यायालयात बाजू मांडू. 

 

 

पुढील स्लाईडवर व्हिडीओ

बातम्या आणखी आहेत...