आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

विराेध डावलून मुलांना घरामध्ये घेतल्याने पत्नीस मरेपर्यंत मारले मुला-मुलीसही मारहाण

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

पुणे -  कामावर गेलेल्या मुलांना घरात येण्यास राेजच्या पेक्षा सुमारे अर्धा तास उशीर झाला. त्यामुळे वडिलांनी त्यांना घरात घेण्यास मज्जाव केला.  मात्र, त्याकडे दुर्लक्ष करून अाईने  दरवाजा उघडून मुलांना अात घेतले. या कारणामुळे रागावलेल्या पतीने पत्नीला मरेपर्यंत बेदम मारहाण केली.  सुधा रवी केसरी (४५) असे मृत महिलेचे नाव अाहे. पुण्यातील धनकवडी परिसरात बुधवारी रात्री हा प्रकार घडला.  याप्रकरणी पाेलिसांनी रवी नंदलाल केसरी (५५, रा. धनकवडी, पुणे) याच्याविराेधात खुनाचा गुन्हा दाखल करून त्याला अटक केली. 


याबाबत अाराेपीचा मुलगा संदीप रवी केसरी (२४) याने वडिलांविराेधात पाेलिसांकडे तक्रार दिली अाहे. केसरी कुटुंबीय धनकवडीतील चव्हाण काॅम्प्लेक्स गृहरचना साेसायटीत राहते. अारोपी रवी हा रिक्षाचालक अाहे. बुधवारी रात्री संदीप व त्याची बहीण हे कामानिमित्त घराबाहेर गेले हाेते. पावणेनऊ वाजेच्या सुमारास ते घरी अाले. मात्र,  उशीर झाल्यामुळे वडील त्यांना घरात घेत नव्हते. मात्र मुलांना रात्री घराबाहेर ठेवणे याेग्य नसल्याने अाई सुधाने काही वेळाने दाेघांनीही घरात घेतले. अापला विराेध असतानाही मुलांना घरात का घेतले, असा जाब विचारत अाराेपी रवीने पत्नी सुधाला व मुलांना शिवीगाळ केली. तसेेच सुधाचे  डाेके जमिनीवर, भिंतीवर जाेरात अापटून तिचा खून केला. 

 

मुला-मुलीसही मारहाण
अाराेपी रवी केसरी याचा मुलांवर खूप राग हाेता. त्याने पत्नीसाेबत मुलगा संदीप व मुलीलाही बेदम मारहाण केली.  संदीप याच्या डाव्या हाताला चावा घेतला.  मानेवरही मारहाण केली. तसेच मुलीचे डाेके काचेवर अापटून तिलाही मारहाण करण्यात अाली. अंगात सैतान संचारलेल्या रवीने अापल्या मुलांदेखत पत्नीचा खून केला.

बातम्या आणखी आहेत...