आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

लोणावळा : सेल्फीच्या नादात 1 हजार फूट खोल दरीत पडला तरुण, दैव बलवत्तर म्हणून असा वाचला

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

लोणावळा - येथील लायन्स पॉईंट येथे सेल्फी काढण्याच्या नादात तरुण थेट दरीत पडल्याची घटना घडली आहे. ही दरी तब्बल 1 हजार फूट खोल आहे. पण 60 फूट खोलवर असलेल्या एका झाडाला पकडल्याने तो अडकला आणि सुदैवाने बचावला. झाडाला पकडल्यामुळे तो घसरून खाली गेला नाही. तरुणाला सुखरूप बाहेर काढण्यात शिवदुर्ग टीमला यश आले. रविवारी दुपारी ही घटना घडली. 

 

सचिन लल्लन उपाध्याय (२१) हा पुण्याचा तरुण त्याच्या मित्रासोबत लोणावळा येथील लायन्स पॉईंट परिसरात फिरण्यासाठी आला होता. त्यावेळी दरीजवळ सेल्फी काढण्याच्या मोहात त्याचा पाय घसरला आणि तो खोल दरीत पडला. पण६० फुटांवर एका झाडाला त्याने धरले व त्यात अडकून तो वाचला. पुढे 1 हजार फूट खोल दरी होती. त्याच्या मित्राला नेमकं काय झाले? काय करावे सूचत नव्हते? पण तेव्हा लोणावळा येथील स्थानिक तरुणांनी हा प्रकार पाहिला. त्यांनी शिवदुर्ग लोणावळा या रेस्क्यू टीमला बोलावले आणि तासाभराच्या प्रयत्नानंतर सचिनला वर काढण्यात आले.

 

अपघातात सचिनला मुक्का मार लागला. प्रवीण देशमुख, अजय शेलार, वैभव शेलार, अभिजीत बोरकर, समीर जोशी, पुनिकेत गायकवाड, तुषार केंडे, राजेंद्र कडू, अजय राऊत, प्राजक्ता बनसोड, वैष्णवी भांगरे, सुनील गायकवाड या शिवदुर्ग रेस्क्यू टीमने सचिनला वाचवले. 

 

पुढील स्लाइड्सवर पाहा, संबंधित PHOTOS...

बातम्या आणखी आहेत...