आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गुजरातचे 'पंतप्रधान' नरेंद्र मोदींचा आजचा अर्थसंकल्प शेवटचाच- राज ठाकरेंची बोचरी टीका

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सातारा- नरेंद्र मोदी हे देशाचे नव्हे गुजरातचे पंतप्रधान आहेत. देशात आणीबाणीसारखी परिस्थिती आणणा-या मोदी सरकारचा खिसा पूर्णपणे फाटला आहे. मात्र ते बाता हजारो कोटींच्या मारत आहेत. जनतेला मूर्खात काढण्याचे दिवस आता संपले असून येत्या निवडणुकीत भाजपा सरकारचा पराभव अटळ आहे, अशी बोचरी टीका करत मोदींचा हा शेवटचाच अर्थसंकल्प आहे अशी खिल्ली मनसेप्रमुख राज ठाकरे यांनी उडविली आहे. देवेंद्र फडणवीस हे रोज नवनविन आकडे काढतात, मला कळत नाही ते रतन खत्रीकडे कामाला होते काय? असा सवाल मुख्यमंत्र्यांवर सडकून टीका केली.

 

2018-19 या आर्थिक वर्षासाठी केंद्रीय अर्थमंत्री अरूण जेटली यांनी लोकसभेत आज अर्थसंकल्प सादर केला. यंदाचे बजेट काहीसे निराशाजनक आहे अशी सामान्य लोकांची प्रतिक्रिया उमटली आहे. त्यातच राज ठाकरे यांनी सातारा येथे बोलताना पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या सरकारचा हा शेवटचाच अर्थसंकल्प आहे अशी बोचरी टीका केली.

 

राज ठाकरे म्हणाले, केंद्रातील नरेंद्र मोदींचे सरकार थापा मारणारे सरकार आहे. आता ही लागण राज्यातील फडणवीस सरकारलाही झाली आहे. 30 वर्षांनी मोदींना पूर्ण बहुमत मिळाले पण त्यासाठी किती थापा मारल्या आणि अजून किती मारणार. हे देवेंद्र फडणवीस तर रोज नवीन आकडे काढताहेत, मला कळत नाही पूर्वी ते रतन खत्रीकडे कामाला होते काय? मुंबईजवळ अरबी समुद्रात उभारण्यात येणारा शिवाजी महाराजांचा अश्वारूढ पुतळा म्हणजे फडणवीस यांनी तुमच्याकडून मत मिळविण्यासाठी दाखविलेले एक खोटं चित्र असल्याचे राज यांनी सांगितले. या दळभद्री राजकारण्यांनी देशाचे वाटोळं केले आहे. नुसते महापुरूषांचे पुतळे उभे करून काहीही होणार नाही. हे भाजप सरकार तुम्हाला धर्मा-धर्मात, जाती-पातीत अडकवत चालले आहे. आता तर जातीय दंगली घडविल्या जात आहेत. मी पूर्वीच तुम्हाला सांगितले होते की, यापुढे मत मिळविण्यासाठी दंगली घडविल्या जातील, कोरेगाव भीमा हा त्याचाच एक भाग असल्याची टीका राज यांनी केली.

बातम्या आणखी आहेत...