आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कोरेगाव भीमा दंगली प्रकरणी तीन अल्पवयीनांसह बारा जण अटकेत, नऊ जणांना काेठडी

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

पुणे- काेरेगाव भीमा येथे १ जानेवारी राेजी झालेल्या हिंसाचारपकरणी अाजवर एकूण ४३ जणांना अटक करण्यात अाली अाहे. त्यापैकी १६ जणांना मंगळवारी अटक करण्यात अाली, तर साेमवारी  सणसवाडी, काेंढापुरी गावातून १२ दंगलखाेरांना ताब्यात घेण्यात अाले हाेते. यात  तीन अल्पवयीन मुलांचा समावेश अाहे. 


साेमवारी पकडलेल्या १२ जणांपैकी तिघे  अल्पवयीन अाहेत. त्यामुळे उर्वरित नऊ जणांना मंगळवारी न्यायालयाने दाेन दिवसांची पाेलिस काेठडी सुनावली. तर अल्पवयीन मुलांची जामिनावर सुटका केली. सीसीटीव्ही फुटेजच्या अाधारे कारवाई करण्यात येत अाहे.  शिक्रापूर पाेलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा पूर्ण केला असून त्यानुसार दंगलीवेळी दाेन गटांतील वादातून १३० वाहने जाळण्यात अाल्याचे स्पष्ट झाले अाहे. सुमारे २ हजार व्हिडिअाे फूटेज पाहून पाेलिसांनी दंगेखाेरांचा शाेध सुरू केला अाहे.


मृताच्या वारसाला १० लाखांची मदत

दंगलीत राहुल फटांगळेचा मृत्यू झाला हाेता. मराठा माेर्चाच्या वतीने बुधवारी त्याला श्रद्धांजली वाहण्यात येईल.  त्याच्या कुटुंबाला २५ लाख रुपये मदतीची मागणीही संघटनेने केली अाहे. दरम्यान, शासनाच्या वतीने राहुलच्या अाईला मंगळवारी दहा लाखांची मदत देण्यात अाली.

बातम्या आणखी आहेत...