आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मुळशीत मारुंजी येथे शॉर्ट सर्किटमुळे शेतातील 40 फळझाडे जाळून खाक

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

पुणे- मुळशी तालुक्यातील मारुंजी येथे महावितरणाच्या उच्च दाब वीज वाहिनीतून झालेल्या शॉर्ट सर्किटमुळे शेतातील तब्बल 40 फळझाडे जळून खाक झाली आहेत. यात आंबा, अंजीर, स्टार फ्रुट(विदेशी फळ) यांची झाडे जाळून खाक झाली आहेत. त्यामुळे येथील शेतकरी अंकुश जगताप हतबल झाले आहेत. 

 

 

गेल्या काही दिवसापासून या ठिकाणी शॉर्ट सर्किट होते. अंकुश जगताप यांच्या शेतातील 40 फळझाडे महावितरणच्या 22 के व्ही उच्चदाब वीजवाहिनीतून झालेल्या शॉर्ट सर्किटमुळे लागलेल्या आगीत भस्मसात झाली आहेत. खडकाळ जमिनीत साडेतीन वर्षांपूर्वी लावलेल्या झाडांना फळधारणा सुरु झाली असताना लागलेल्या या आगीत 3 ते 4 लाखाहून जास्त नुकसान झाले असल्याची माहिती शेतकरी जगताप यांनी दिली आहे. आग काल रात्री लागली होती, शेतामध्ये गेल्यानंतर ही बाब समोर आली. विशेष म्हणजे ही आग लागण्याच्या दोन दिवस अगोदर दुसऱ्या ठिकाणी अशाच प्रकारे आग लागली होती. त्यामुळे नुकसानीचा पंचनामा करून भरपाई द्यावी अशी मागणी अंकुश जगताप यांनी केली आहे.

 

 

पुढील स्लाईडवर आणखी फोटो आणि माहिती

बातम्या आणखी आहेत...