आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ट्रिपल तलाकवर भाष्य करणा-या \'हलाल\' विरोधातील याचिका फेटाळली, प्रदर्शनाचा मार्ग मोकळा

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
'हलाल' चित्रपटाविरोधातील याचिका हायकोर्टाने फेटाळल्याने त्याच्या प्रदर्शनाचा मार्ग मोकळा झाला आहे. - Divya Marathi
'हलाल' चित्रपटाविरोधातील याचिका हायकोर्टाने फेटाळल्याने त्याच्या प्रदर्शनाचा मार्ग मोकळा झाला आहे.

पुणे- तिहेरी तलाकची प्रक्रिया अाणि त्यातून घडणारी गाेष्ट दाखविणा-या ‘हलाल’ चित्रपटा विराेधात मुस्लीम संघटना ‘अावामी मुस्लीम पार्टी’ यांनी दाखल केलेली याचिका मुंबर्इ उच्च न्यायालयाने फेटाळून लावली अाहे. त्यामुळे सदर चित्रपट प्रदर्शित करण्याचा मार्ग माेकळा झाला अाहे. 

 

हलाल या मराठी चित्रपटात मांडण्यात अालेली कथा ही पूर्णता कुरान व शरियतच्या विराेधात मांडली अाहे. त्यामुळे मुस्लीम समाजाच्या भावना दुखावल्या जाऊन समाजात त्याचे विपरीत हाेणार असल्याने हलाल चित्रपट प्रदर्शित करु नये. तसेच राज्य सरकारला याबाबत तात्कळ माहिती पाठवून राज्यात चित्रपट प्रदर्शित करु नये अशी मागणी अावामी मुस्लीम पार्टी यांनी केली हाेती. 

 

न्यायमूर्ती सत्यरंजन धर्माधिकारी अाणि न्या. भारती डांगरे यांनी स्पष्ट केले की, ‘एखाद्या कलाकृतीच्या विरुध्द ज्यांचे मत अाहे त्यांना ती कलाकृती प्रदर्शनापासून थांबविण्याचे मूलभूत अधिकार अाहेत असे नाही. केवळ कायदेशीर मार्गांनी त्यांचे मत मांडण्याचा अधिकार त्यांना अाहे. कुणाला एखादा सिनेमा बघण्याची जबरदस्ती नाही अाणि त्याबद्दलचे टीकात्मक परिक्षण घटनात्मक चाैकटीतून करता येऊ शकते हाच लाेकशाहीचा खरा अर्थ अाहे.

 

अावामी विकास पार्टीने दाखल केलेल्या याचिकेत जनहिताचा कोणताच मुद्द नव्हता. अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा अर्थ समजून घेण्यात अालेल्या अज्ञानातून ही याचिका दाखल करण्यात अाल्याचे हलाल चित्रपटाचे निर्माते अमाेल काग्ने यांची बाजू मांडणाऱ्या अॅड. असीम सराेदे यांनी सांगितले अाहे. 


1981 मध्ये ज्येष्ठ लेखक राजन खान यांनी लिहिलेल्या ‘हलाल’ या कांदबरीवर अाधारित सिनेमामुळे मुस्लीम समाजाच्या भावना दुखावल्या असा अाराेप याचिकेतून करण्यात अाला. दाेनदा सेन्साॅर बाेर्ड समाेर सदर सिनेमाचे सादरीकरण करण्यात अाले हाेते व त्यांनी त्याबाबत सेन्साॅर प्रमाणपत्र दिले हाेते. 

 

पुढे स्लाईडद्वारे पाहा, यासंबंधित माहिती व फोटोज व शेवटच्या स्लाईडवर या सिनेमाचा ट्रेलरचा व्हिडिओ....

बातम्या आणखी आहेत...