आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बसच्या धडकेत तरूणाचा मृत्यू, संतप्त नाकरिकांनी केली बसची तोडफोड

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

पिंपरी चिंचवड- रस्ता ओलांडणाऱ्या तरुणाचा पीएमपीएमएल बसच्या धडकेत मृत्यू झाल्याची घटना पिंपरी चिंचवड येथे घडली आहे. साहेद आलम (वय २०) असे अपघातात मृत्यू झालेल्या तरुणाचे नाव आहे. घटनेनंतर संतप्त नागरिकांनी बस वर दगडफेक केली. गुरूवारी रात्री रात्री 11 च्या सुमारास ही घटना घडली. याप्रकरणी पोलिसांनी बस चालक शशिकांत बाळकृष्ण वासाळे याला ताब्यात घेतले आहे. 


पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, नाशिक फाटा परिसरात पीएमपीएमएल बस (क्रमांक एम-एच १२ के क्यू- ०९३६) ही हिंजवडी वरून भोसरी येथे जात होती. नाशिक फाटा पुलाजवळ बीआरटी मधून जात असताना साहेद आलम रस्ता ओलांडत होता. तेवढ्यात भरधाव वेगात असलेल्या बसने त्याला जोरदार धडक दिली. या अपघातात साहेद गंभीर जखमी झाला. त्याला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले. परंतु, आज सकाळी उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला आहे. 


अपघातानंतर संतप्त नागरिकांनी बसची तोडफोड केली. घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले आणि चालक शशीकांत वासाळे याला ताब्यात घेतले. साहेद कुटुंबातील एकुलता एक मुलगा होता. त्याच्या मृत्यूमुळे कुटुंबात दुःखाचे वातावरण पसरले आहे. साहेदच्या पश्च्यात कुटुंबात आई, वडील आणि चार बहिणी आहेत. आतापर्यंत साहेदच संपूर्ण कुटुंबाचा उदरनिर्वाह करत होता.

 

पुढील स्लाइडवर पाहा संबंधीत फोटोज्....

बातम्या आणखी आहेत...