आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पुणे-मुंबई द्रुतगती मार्गावर सोमाटणे फाटा येथे अपघातात 1 ठार, 1 जखमी

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अपघात झालेल्या ठिकाणचे भीषण दृश्य. - Divya Marathi
अपघात झालेल्या ठिकाणचे भीषण दृश्य.

पुणे- पुणे-मुंबई द्रुतगती मार्गावर सोमाटणे फाटा येथे दोन मालवाहू टेम्पो य‍ांच्यामध्ये झालेल्या अपघात झाला आहे. या अपघातात एक जण जागीच ठार झाला असून एकजण गंभीर जखमी झाला आहे. हा अपघात आज (रविवार) पहाटे साडेतीनच्या सुमारास घडला आहे.

 

 

मिळालेल्या माहितीनुसार, दोन्ही मालवाहू वाहने ही पुण्याहून मुंबईच्या दिशेने निघाली होती. सोमाटणे गावाच्या हद्दीत मागील वाहनचालकाचा गाडीवरील ताबा सुटल्याने तो समोरच्या वाहनावर आदळल्याने हा अपघात झाला. टेम्पो उलटल्याने चालकाचा जागीच मृत्यू झाला. तर अन्य एक जण जखमी झाला. अपघाताची माहिती समजताच महामार्ग पोलिस व रुग्णवाहिका घटनास्थळी पोहोचल्या. त्यांनी मृत्यू झालेल्या व्यक्तीचा मृतदेह गाडीबाहेर काढत जखमीला उपचाराकरिता तळेगाव दाभाडे येथील रुग्णालयात दाखल केले आहे. या अपघातामुळे काही काळ द्रुतगतीवर वाहतुकीचा खोळंबा झाला होता. महामार्ग पोलिसांनी अपघातग्रस्त वाहने तातडीने बाजूला केल्यानंतर मार्गावरील वाहतूक पूर्वपदावर आली.

बातम्या आणखी आहेत...