आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करापुणे - चालू दुचाकीवर तोल सांभाळणारी साशा अन् स्कॉच... रॅम्पवर रुबाबात चालणारे रोमिओ व ज्युलिएट... मेरी ख्रिसमस झालेला ब्रुनो... ट्रेझरहंट खेळातून खाद्य शोधणारी आणि अडथळ्यांची शर्यत पार करणारी अनेक श्वानमंडळी..असे दृश्य सोमवारी पुण्यातील प्राणिप्रेमींनी अनुभवले.
निमित्त होते, लोकबिरादरी मित्रमंडळ, पुणेतर्फे आयोजित पाळीव कुत्र्यांच्या गंमत जत्रेचे. अर्थात ‘फन फेअर विथ पॉज अँड टेल्स’ या विशेष कार्यक्रमाचे. हेमलकसा (गडचिरोली) येथील डॉ. प्रकाश आमटे यांच्या लोकबिरादरी प्रकल्पातील जखमी वन्यप्राण्यांच्या अनाथालयाच्या मदतीसाठी कोथरूड येथे या विशेष कार्यक्रमाचे आयोजन केले होते. याप्रसंगी भारतीय विद्याभवनचे सचिव नंदकुमार काकिर्डे, लोकबिरादरी मित्रमंडळ पुणेचे शिल्पा तांबे, योगेश कुलकर्णी, शिल्पा टेम्भे, ऐश्वर्या यांच्यासह मोठ्या संख्येने स्वयंसेवक उपस्थित होते.
फॅन्सी ड्रेस, रॅम्पवॉक, अडथळ्यांची शर्यत, रिले, ट्रेझरहंट, गेस युअर डॉग वेट, हिट फॉर ट्रीट अशा खेळांसह श्वानांना अवगत असलेल्या विविध कलाप्रकारांचे सादरीकरण या गंमत जत्रेत झाले. विविध जातींच्या एकूण ६८ श्वानांनी यामध्ये सहभाग घेतला. श्वान खाद्याचे स्टॉल्स, फोटो बूथ, प्राण्यांच्या छायाचित्रांचे प्रदर्शन आदींमुळे परिसराला जत्रेचे स्वरूप आले होते. विजेत्या श्वानांना स्मृतिचिन्ह, प्रमाणपत्र आणि खाद्याचे पॅकेट देऊन गौरवण्यात आले. शिल्पा तांबे व योगेश कुलकर्णी यांनी या गंमत जत्रेच्या आयोजनामागील भूमिका स्पष्ट केली.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.