आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

या आद्य क्रांतीवीराने इंग्रजांना केले होते घायाळ! एका फितुरीमुळे झाली फाशी

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
उमाजी नाईक - Divya Marathi
उमाजी नाईक

पुणे- महाराष्ट्रभूमी ही स्वातंत्र्यप्रेमी योद्धा-रत्नांची खान आहे. मोगली सत्तेविरुद्ध स्वराज्याचा उठाव करत छत्रपती शिवाजी महाराजांनी पहिले देशी राज्य स्थापन केले. पुढे इंग्रजांचा धोका लक्षात घेउन यशवंतराव होळकरांनी इंग्रजांविरुद्ध एकहाती युद्ध पुकारुन 1803 ते 1810 या काळात तब्बल अठरा वेळा इंग्रजांना पराभूत केले. पण दुर्दैवाने होळकरांचा 1811 साली अकाली मृत्यू झाला आणि स्वातंत्र्यलढा जवळपास थांबल्यात जमा झाला. 1818 साली इंग्रजांची सत्ता देश गिळून बसली. पण स्वातंत्र्याची आस मनी जागवत लढा स्वातंत्र्यलढा उभारायला महराष्ट्राच्या मातीतून शिवाजी महाराज आणि यशवंतराव होळकरांपासून प्रेरणा घेत एक महावीर इंग्रजांशी सर्वकश युद्ध करायला उभा ठाकला होता...तो म्हणजे आद्य क्रांतीवीर उमाजी नाईक (कार्यकाळ 1791 ते 1832)!. शनिवारी (3 फेब्रुवारी) या महान स्वातंत्र्य योद्धाची पुण्यतिथी होती. त्यानिमित्त त्यांच्या व्यक्तिमत्त्वावर टाकलेला प्रकाश...

 

7 सप्टेंबर 1791 रोजी उमाजी नाईकांचा लक्ष्मीबाई व दादोजी खोमणे या रामोशी/बेरड दांपत्याच्या उदरी भिवडी (ता. पुरंदर) येथे जन्म झाला. वंशपरंपरेने पुरंदर किल्ल्याचे रक्षण करण्याची जबाबदारी त्यांच्यावर होती. त्यामुळे त्यांना नाईक ही उपाधी होती. 1803 साली दुस-या बाजीरावाने इंग्रजांचे अंकितत्व पत्करल्यानंतर इंग्रजांनी किल्ल्यांच्या रक्षणासाठी असलेली परंपरागत तरतूद नष्ट केली आणि रामोशी-बेरडांची हकालपट्टी केली. शिवकाळापासून गड-कोटांचे रक्षक असनारे रामोशी यामुळे हादरुन जाणे व त्यामुळे त्यांना इंग्रज सत्तेचा संताप येणे स्वाभाविक होते. हा समाज मुळात स्वतंत्रताप्रिय. त्यात उत्तरेत यशवंतराव होळकर इंग्रजांचा कसा धुव्वा उडवत आहेत या वार्ताही महाराष्ट्रात येतच होत्या. त्यापासून प्रेरणा घेत उमाजींनी वयाच्या अवघ्या अठराव्या वर्षापासून क्रांतीकार्य सुरु केले.

 

जेजुरीच्या खंडेरायासमोर आपल्या विठोजी नाईक, कृष्ण नाईक, खुशाबा रामोशी अशा काही मित्रांसोबत भंडारा उधळत इंग्रजी राज्य नष्ट करण्याची प्रतिज्ञा केली. पुढे मोजक्या सहका-यांसह इंग्रज, वतनदार यांच्यावर गनीमी काव्याने हल्ले करुन मिळालेली लुट गोरगरीबांत वाटायला सुरुवात केली. आयाबहीणींची अब्रू वाचवली. इंग्रज यामुळे अस्वस्थ होणे स्वाभाविक होते. त्यांनी उमाजीवर खटला चालवून 1818 साली एक वर्षाची शिक्षा फर्मावली. तुरुंगवासाच्या काळात उमाजी लिहायला-वाचायला शिकले. ते बाहेर आले ते मोठ्या उठावाची तयारी करुनच!

 

पुढे स्लाईडद्वारे वाचा, उमाजी नाईक यांच्या कार्याबाबत...

बातम्या आणखी आहेत...