आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कातरवेळ होताच रेडलाइट एरियामध्‍ये बदलतो पुण्यातील पुस्‍तकांचा बाजार

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

पुणे- 'विद्येचेे माहेर घर' म्हणून पुुण्याची जगभरात ओळख आहे. बुधवार पेठ हा पुण्यातील सर्वात जुना परिसर. पुस्तकांची बाजारपेठ अर्थात 'अप्पा बळवंत चौक' बुधवार पेठेेला लागूूनच आहे. या चौकात दिवसभर पुस्‍तके खरेदी करणाऱ्यांची गर्दी होते तर सूर्य मावळतीकडे जाताना या परिसरात वेश्‍या बाजार गजबजतो. सेक्स वर्कर्सच्‍या समस्‍या सोडवण्‍यासाठी झटणाऱ्या 'सहेली' या संस्‍थेने या ठिकाणी 'सुरक्षा' नावाने एक सर्व्हे केला. त्‍यात या दलदलित अडकलेल्‍या मुली आणि महिलांचे विदारक वास्‍तव समोर आले आहे.

 

आशिया खंडातील दुसऱ्या क्रमांकाचा रेड लाइड एरिया
'सहेली' ने बुधवारपेठेतील वेश्‍यांचे आरोग्‍य, त्‍यांचे कौटुंबिक जीवन, चालीरीती यांचे सर्वेक्षण केले. विशेष म्‍हणजे हा आशिया खंडातील दुसऱ्या क्रमांकाचा मोठा रेड लाइड एरिया आहे. सध्‍या या ठिकाणी 440 कोठे आहेत. ज्‍यामध्‍ये 5 हजारांपेक्षा अधिक सेक्‍स वर्कर्स राहतात.


सर्व्हेचा उद्देश
सहेली संस्थेच्‍या संचालिका तेजस्विनी सेवेकारी यांनी सांगितले, सेक्स वर्कर्संना त्‍यांच्‍या आरोग्‍याविषयी जागरुक करणे, हाच या सर्व्हेचा मुख्‍य उद्देश आहे. देह विक्री करणाऱ्या महिलांचा मासिक धर्म, त्‍यांची प्रजनन क्षमता आणि गुप्‍तरोगासंबंधी सर्व छोट्या मोठ्या गोष्‍टींची माहिती जमा केली आहे. त्‍यांना गर्भावस्था, मातृ देखभाल, स्तनपान, प्रसूती, सुरक्षित गर्भपात, कुटुंब नियोजन यासाठी काय करावे यांची तपशीलवार माहितीही दिली आहे.


1 हजार सेक्स वर्कर्सचा सर्व्हे
या सर्व्हेसाठी संस्‍थेने सामाजिक कार्यकर्ते, आरोग्‍य तज्‍ज्ञ, ट्रेंड काउंसलर, एक अकाउंटंट आणि एक प्रोजेक्ट डायरेक्टर या सर्वांमिळून एक टीम तयार केली होती. विशेष म्‍हणजे यामध्‍ये सहभागी अकाउंटंट एका सेक्स वर्करची मुलगी आहे. यातून वस्‍तुनिष्‍ठ माहिती मिळावी, यासाठी स्‍थानिक नागरिक, पोलिस यांचीही मदत घेतली गेली. सर्वेच्‍या पहिल्‍या टप्‍प्‍यात ही टीम एक हजार सेक्‍स वर्कर्सपर्यंत पोहोचली.


पुढील स्लाइडवर वाचा, अत्‍यंत खडतर आहे वेश्यांचे जीवन


(Pls Note-तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या WhatsappआणिFacebookच्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.)

 

बातम्या आणखी आहेत...