आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भाजप सरकार मागच्या दाराने देशात आणीबाणी आणतेय- अजित पवारांचा आरोप

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नगर- देशातील सध्याची परिस्थिती व नेत्यांच्या वक्तव्याचा जनतेवर गंभीर परिणाम होत अाहे. देशात व राज्यात फसवे सरकार आहे. सरकारने ओबीसींच्या शिष्यवृत्त्या संपवल्या गरिबांचा मुलगा शिकू नये, असा यांचा छुपा डाव आहे. प्रसारमाध्यमांवर दबाव आणण्याचा प्रयत्न असून मागच्या दाराने आणीबाणी आणण्याचा यांचा विचार आहे. समाजात कुठल्याही घटकाला या सरकारकडून न्याय मिळत नाही. महाराष्ट्रात पेट्रोल, महाग, डिझेल महाग, गॅस महाग. मोदी सरकार हे पूर्णपणे फसवे अाहे. जाती व धर्मांत तेढ निर्माण करणारे हे सरकार आहे. धनगर, लिंगायत, मराठा या समाजाचा कुठलाही विचार झालेला नाही. खोटे बोल, पण रेटून बोल, अशी या सरकारच्या कामाची पद्धत आहे. असा गंभीर आरोप माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केला. राज्य सरकार शेतकऱ्यांना आत्महत्येपासून परावृत्त करू शकले नाही. चुकीच्या धोरणांमुळे शेतकऱ्यांबरोबरच सर्वसामान्य जनताही पोळून निघाली आहे असेही ते म्हणाले.

 

पवार म्हणाले, उद्योगक्षेत्रात मंदीचे वातावरण आहे. कायदा व सुव्यवस्थेचा बोजवारा उडाला आहे. रोजगार उपलब्ध करून देण्याऐवजी भजी तळायचे सल्ले दिले जात आहेत. शेतकऱ्यांच्या आत्महत्या थांबवण्यातही राज्य सरकार अपयशी ठरले आहे. केंद्रातील परिस्थितीही विदारक आहे. हजारो कोटींचे घोटाळे उघडकीस येत आहेत. बडे उद्योजक बँकांना लुबाडून देशाबाहेर पळत आहेत. कायम नफ्यात असलेली स्टेट बँकही तोट्यात गेली. त्याची उत्तरे कुणीच देत नाही. गेल्या काही दिवसांत ४० जवान शहीद झाले. 

 

निवडणुकीपूर्वी प्रत्युत्तर देण्याची भाषा करणारे आता मात्र उत्तरे देत नाहीत. चीनमुळे देशात निर्माण झालेली परिस्थिती १० वर्षे डॉ. मनमोहन सिंग पंतप्रधान असताना कधी उद््भवली नाही. आता मात्र ही देशासाठी चिंतेची बाब झाली आहे. या सर्व घटना विचार करायला लावणाऱ्या असून देशात मागच्या दाराने आणीबाणी आणण्याचा प्रयत्न सुरू असल्याचा आराेप पवार यांनी केला. आमचे कुठलेही म्युचअल अंडरस्टँडिंग नाही, असे सांगत शिवसेना बाहेर का पडत नाही, कर्जमाफीच्या मुद्द्यावर सरकारला विरोधच करायचा असेल, तर शिवसेना मंत्रिमंडळात ठाम भूमिका का घेत नाही, असा सवाल पवार यांनी केला. 

 

पुढे स्लाईडद्वारे पाहा, धनजंय मुंडे काय म्हणाले नगरमध्ये....