आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पुणे: रेल्वे स्टेशनवरील यार्डात उभ्या एसी कोचला भीषण आग, मोठी दुर्घटना टळली

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
एसी थ्री टियरच्या कोचमध्ये लागली भीषण आग.... - Divya Marathi
एसी थ्री टियरच्या कोचमध्ये लागली भीषण आग....

पुणे- पुणे रेल्वे स्टेशनवर मालधक्का चौकात यार्डात मोकऴ्या उभी असलेल्या एका ट्रेनच्या एसी 3 टीयर कोचला शुक्रवार दुपारी भीषण आग लागली. या अगीत कोच संपूर्णपणे जळून खाक झाला. रेल्वेकडून माहिती दिली मात्र आगीचे कारण स्पष्ट करण्यात आले नाही. या घटनेत कोणीही जखमी झाले नाही. मात्र, मोठी दुर्घटना टळली. 

 

- कोचच्या साफसफाईसाठी ट्रेन यार्डात आणली गेली होती. अचानक कोणीतरी कोचमधून धूर निघत असल्याचे सांगितले त्यानंतर फायर ब्रिगेडला फोन करून याची माहिती दिली गेली.

- रेल्वे स्टेशनच्या जवळच फायर ब्रिगेडचे ऑफिस असल्याने काही मिनिटात  5 पाण्याचे बंब घटनास्थळी पोहचले व काही मिनिटांतच आग आटोक्यात आणली. 

- पुणे रेल्वे स्टेशन सर्वात गर्दीचे रेल्वे स्टेशनपैकी एक आहे. ही घटना मोठ्या दुर्घटनेत बदलू शकली असती मात्र फायर ब्रिगेडने तत्काळ प्रतिसाद दिल्याने ही दुर्घटना टळली.

- रेल्वेने या अगीचे चौकशीचे आदेश दिले आहेत. आग यार्डात लागली असल्याने ट्रेनच्या येण्या-जाण्यावर त्याचा काहीही परिणाम झाला नाही.

बातम्या आणखी आहेत...