आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अभिनेते आनंद अभ्यंकर यांच्या वारसांना 72 लाख रुपये भरपाई; लाेकअदालतीत निर्णय

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

पुणे- ज्येष्ठ अभिनेते अानंद अभ्यंकर यांचा २०१२ मध्ये पुणे-मुंबर्इ द्रुतगती महार्गावर अपघातात मृत्यू झाला होता. त्यानंतर त्यांच्या वारसांनी जुलै २०१४ मध्ये माेटार अपघात दावा न्यायाधिकरण येथे अॅड.संदीप फडके यांच्यामार्फत १ काेटी रुपये नुकसान भरपार्इ मिळण्यासाठी अर्ज दाखल केला हाेता. लाेकअदालतमध्ये तडजाेडीअंती कायदेशीर वारसास ७२ लाख रुपयांची नुकसान भरपाई मंजूर करण्यात अाली अाहे.    


या प्रकरणात नॅशनल इन्शुरन्स कंपनी प्रतिवादी हाेती. हा अर्ज प्रमुख जिल्हा न्यायाधीश एस.माेडक यांच्या न्यायालयात प्रलंबित असताना तडजाेडीबाबत प्राथमिक चर्चा झाल्या. त्यानंतर हा अर्ज १० फेब्रुवारी राेजी लाेकअदालतमध्ये सत्र न्यायाधीश मेणजाेगे, अॅड.जयश्री वाकचाैरे, अॅड.संताेष काशीद यांच्या पॅनलपुढे अाला. तेव्हा इन्शुरन्स कंपनीचे अधिकारी व अर्जदार यांच्यात चर्चा हाेऊन इन्शुन्स कंपनीने नुकसान भरपार्इची रक्कम ७२ लाख रुपये देण्याचे मान्य केले. अर्जदारांतर्फे अॅड.संदीप फडके यांनी तर इन्शुरन्स कंपनीतर्फे अॅड. प्रशांत चव्हाण यांनी काम पाहिले. लाेकअदालतीमुळे अल्पावधीत न्याय मिळाल्याची भावना अभ्यंकर यांच्या कुटुंबीयांनी व्यक्त करत त्यांचे वकील आणि न्यायपालिकचे आभार 
मानले आहेत.

बातम्या आणखी आहेत...