आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

एटीएममधून 74 लाखांची लूट करणाऱ्या अाराेपींनी मोबाइल, कपडे आणि पार्ट्यांवर उधळली रक्कम

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

पुणे- अॅक्सिस बँकेच्या पिंपळे सौदागर येथील एटीएम मशीनमध्ये भरण्यासाठी आणलेली ७४ लाख रुपयांची रोकड संगनमताने पळवून नेणाऱ्या आरोपींना ७२ तासांत मुद्देमालासह पकडण्यात पोलिसांनी यश मिळवले आहे. या तीन आरोपींकडून ६७ लाख रुपयांची रोकड हस्तगत करण्यात आली आहे. वाहनचालक आरोपी फरार आहे. अटक करण्यात अालेले अाराेपी बीड व अाैरंगाबाद जिल्ह्यातील अाहेत. 

 
३१ जानेवारीला पिंपळे सौदागर येथील एटीएम मशीनमध्ये भरण्यासाठी ७४ लाखांची रोकड पाठवण्यात आली होती. वाहन मशीनजवळ पोहोचताच सुरक्षा रक्षक आणि रोखपाल खाली उतरले. तेवढ्यात चालक रणजित कोरेकर याने रोकड असलेले वाहन सुसाट वेगाने पळवले. हे वाहन भोसरी येथे दुसऱ्या दिवशी पोलिसांना सापडले. मात्र त्यातील रोकड आणि चालक रणजित फरार होते.  


दोन दिवसांत त्वरेने हालचाली करत पोलिसांनी बीड आणि औरंगाबाद येथून विठ्ठल जाधव, अमोल धुते आणि त्र्यंबक नैरागे (सर्व राहणार बीड) यांना ताब्यात घेतले. त्यांच्याकडून ६७ लाखांची रोकडही हस्तगत करण्यात आली आहे. उर्वरित रक्कम त्यांनी अवघ्या अडीच दिवसांत मोबाइल, कपडे आणि पार्ट्यांवर उडवल्याची कबुली दिली आहे.  


एेषाेअारामामुळे कर्जबाजारी, सहकाऱ्याला दिला धाेका  
विठ्ठल, अमोल आणि त्र्यंबक मूळचे बीडचे.  ब्रिनक्स कंपनीत अमोल याला काम मिळाले होते. पण १५ दिवसांत त्याने ते सोडून दिले. ऐषोआरामात खर्च वाढल्याने ते कर्जबाजारी झाले होते. त्यातच चालक रणजितशी त्यांचा परिचय झाला. त्यालाही अाराेपींनी रोकड पळवण्याच्या कटात सहभागी केले. रोकड पळवल्यावर मात्र त्यांनी रणजितला एकही पैसा न देता, रक्कम स्वत:च्या ताब्यात घेतली. रणजित मात्र अद्याप फरार आहे. 

बातम्या आणखी आहेत...