आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

‘मुक्तछंद’मधून अवचटांचा जीवनप्रवास; 4 मार्चला राष्ट्रीय चित्रपट संग्रहालयात प्रदर्शन

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

पुणे- साहित्यिक, कलावंत, समाजचिंतक, संशोधक, ..अशा अनेक पैलूंनी सुपरिचित असणारे ज्येष्ठ लेखक डॉ. अनिल अवचट यांचे बहुआयामी व्यक्तिमत्त्व माहितीपटाच्या माध्यमातून आता उलगडणार आहे.  अनिल अवचट – एक मुक्तछंद असे या माहितीपटाचे शीर्षक असून, ४ मार्च रोजी राष्ट्रीय चित्रपट संग्रहालयात या माहितीपटाचे प्रथम प्रदर्शन केले जाणार आहे.

 

माहितीपटाचे लेखन, संशोधन, दिग्दर्शन प्रदीपकुमार माने यांचे आहे, तर माहितीपटासाठी अभिनेते सचिन खेडेकर यांच्या आवाजातील निवेदन आहे. माहितीपटाविषयी सांगताना प्रदीपकुमार माने म्हणाले,‘आपल्याकडे लेखकांविषयीच्या माहितीपटांचे प्रमाण नगण्य दिसते. एक वाचक म्हणून अवचट हे माझे आवडते लेखक होतेच, पण त्यांच्या लेखनातून, त्यांच्या संशोधनातून, वावरण्यातून, संवादातून लेखका पलीकडचे अवचट नव्याने गवसले आणि सामाजिक  अंगाने अवचट चित्रित करून ठेवण्याचा विचार मनात आला. एक प्रकारचे दस्तऐवजीकरण यानिमित्ताने शक्य झाले. हा सारा प्रकल्प वेगवेगळ्या टप्प्यांवर कसोटी पाहणारा होता, पण सगळ्या अडचणींवर मात करत आता हा माहितीपट प्रदर्शनासाठी सज्ज झाला आहे. 

 

असा आहे ‘मुक्तछंद’    
रिपोर्ताज स्वरूपाच्या लेखनाचा फारसा रिवाज मराठीमध्ये याआधी नव्हता. डॉ. अवचट यांनी संशोधनपर लेखनातून तो रुजवला आहे. त्या अनुषंगाने त्यांनी केलेला विविध समाजघटकांचा, त्यांच्या जगण्याचा, समस्यांचा विचार यापूर्वी कुणीच केला नव्हता. वंचितांचे हे प्रश्न त्यांच्या लेखनातून समाजापुढे आले. सर्जनशील साहित्यिक, सामाजिक दायित्व कृतीशील करणारा कार्यकर्ता आणि कलांची जोपासना करणारा संवेदनशील मनाचा हळूवार माणूस ‘मुक्तछंद’मधून भेटणार आहे. 

बातम्या आणखी आहेत...