आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आठ महिन्याच्या मुलीला पुणे रेल्वे स्थानकावरुन पळवले, सीसीटीव्हीत कैद झाली घटना

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पुणे रेल्वे स्थानकावर 5 फेब्रुवारी रोजी एका महिलेने 8 महिन्याच्या मुलीला पळवून नेले. - Divya Marathi
पुणे रेल्वे स्थानकावर 5 फेब्रुवारी रोजी एका महिलेने 8 महिन्याच्या मुलीला पळवून नेले.

पुणे- एका महिलेने पुणे रेल्वे स्थानकावरुन एका आठ महिन्याच्या मुलीला पळविल्याची घटना घडली आहे. ही महिला सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली असून पोलिस तिचा शोध घेत आहेत.

 

 

घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद

- पोलिसांनी दिलेल्या गेनसिद्द चाबुकस्वार हे आपल्या पत्नी आणि आठ महिन्यांच्या मुलीसह नोकरीच्या शोधात पुण्यात आले होते.
- चाबुकस्वार यांना पुण्यात नोकरी न मिळाल्याने ते पुन्हा आपल्या गावी अक्कलकोट येथे जाण्यासाठी पुणे रेल्वे स्थानकावर आले होते.
- रेल्वे स्थानकावर असणाऱ्या दर्ग्याजवळ ते बसले होते. तेव्हा एक महिला तिथे आली आणि ती त्यांच्याशी गप्पा मारु लागली.
- त्यांना खूप तहान लागल्यावर ते पाणी पिण्यासाठी गेले तेवढ्या वेळात त्या महिलेने त्यांच्या मुलीला पळवले.
- रेल्वे पोलिसांनी या परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासला असता त्यांना ही महिला मुलीला घेऊन जात असतानाचे सीसीटीव्ही फुटेज मिळाले आहे. पोलिसांनी या महिलेचा शोध सुरु केला आहे. 

 

 

पुढील स्लाईडवर आणखी फोटो आणि माहिती

बातम्या आणखी आहेत...