आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

एटीएममधील एक लाख 76 हजारांच्या 16 बॅटऱ्या भुरट्या चोरांनी केल्या लंपास

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सांकेतिक फोटो. - Divya Marathi
सांकेतिक फोटो.

पुणे- पिंपरी-चिंचवड परिसरातील सांगवी, पिंपळे गुरव येथे भुरट्या चोरांनी एटीएममधील तब्बल एक लाख 76 हजार रुपयांच्या 16 बॅटरी चोरल्या आहेत. या प्रकरणी सांगवी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर एका संशयिताला ताब्यात घेण्यात आले आहे.

 

 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सृष्टी चौक, रामकृष्ण मंगल कार्यालय चौक आणि त्रिमूर्ती चौक येथील एसबीआयच्या एटीएममधील आतील दरवाजा तोडून बॅटऱ्या लंपास केल्या आहेत. यात माकन चौक, जुनी सांगवी येथील बँक ऑफ महाराष्ट्रच्या एटीएमचा देखील समावेश आहे. अशा ऐकून 16 बॅटरी आणि 2 यु.पी.एस चोरी केले आहेत. याप्रकरणी सांगवी पोलिसात सचिन शिवकिरण काळगे (वय-30, रा.थेरगाव) यांनी फिर्याद दिली आहे. एका संशयिताला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. चोरी झाली त्या ठिकाणी सुरक्षारक्षक नव्हता. 

 

 

पुढील स्लाईडवर आणखी फोटो 

 

 

 

बातम्या आणखी आहेत...