आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शनिवारवाड्यावर आयोजित कार्यक्रमावरून नवीन वाद; पेशव्यांचे वंशज, ब्राह्मण संघटनांचा विरोध

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

पुणे- भीमा कोरेगाव शौर्य दिनाच्या निमित्ताने  शनिवारवाड्यावर आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमावरून नवीन वादाला तोंड फुटले आहे. पेशव्यांचे वंशज आणि ब्राह्मण संघटनांनी या कार्यक्रमाला विरोध केला आहे.

 

 

इंग्रजांनी केला होता पेशव्यांचा पराभव
1 जानेवारी 1818 ला पुण्याजवळ भीमा कोरेगावात झालेल्या ऐतिहासिक लढाईत महार सैनिकांच्या नेतृत्वाखाली लढलेल्या इंग्रजांनी पेशव्यांचा पराभव केला होता. दलित संघटनांतर्फे हा दिवस शौर्य दिन म्हणून साजरा केला जातो. दरवर्षी प्रमाणे यंदाही भीमा कोरेगाव मध्ये कार्यक्रम होणार आहे. मात्र या घटनेला 200 वर्ष पूर्ण होत असल्याच्या निमित्ताने काही संघटनांनी पुण्यातील शनिवार वाड्यावर कार्यक्रमाचे आयोजन केले आहे. लोकशासन आंदोलन, संभाजी ब्रिगेड, कबीर कला मंच यांसह सुमारे 40 संघटना त्यात सहभागी होणार आहेत. हा कार्यक्रम म्हणजे नव्या पेशवाईच्या विरोधातील एल्गार परिषद असल्याचे या संघटनांचे म्हणणे आहे. दुसऱ्या बाजूला पेशव्यांचे वंशज तसेच ब्राह्मण संघटनांनी शनिवार वाड्यावर हा कार्यक्रम होण्यास विरोध दर्शवला आहे.

 

पुढील स्लाईडवर आणखी फोटो आणि माहिती

बातम्या आणखी आहेत...