आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ब्लू व्हेल गेमच्या नादापायी पुण्यात तरुणाची आत्महत्या?

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

पुणे- कात्रज परिसरात राहणाऱ्या एका तरुणाने केलेल्या आत्महत्येमागे  “ब्लू व्हेल’ गेमची शक्यता पोलिसांकडून  पडताळली जात आहे. या तरुणाकडे चार अॅन्ड्रॉइड फोन होते. तसेच, त्याला रात्री उशीरापर्यंत मोबाइलवर गेम खेळण्याची सवय होती. मध्यंतरी गेम खेळण्याच्या नादात त्याने पायावर ब्लेडने वार केले होते. याप्रकारचे वार ब्लू व्हेल गेम खेळणारे करतात.


युसूफ याकुब शेख (२४, रा.संतोषनगर,पुणे) असे आत्महत्या केलेल्या तरुणाचे नाव आहे. तो रविवारी गळफास घेतलेल्या अवस्थेत घरी आढळला होता. त्याच्या वडिलांची कात्रज, कोंढवा, संतोषनगर आदी ठिकाणी भंगाराची दुकाने आहेत. या व्यवसायात युसूफ मदत करायचा. तो रात्री घरी आल्यावर उशीरापर्यंत मोबाइलवर गेम खेळायचा. त्यांच्या मित्रांनाही या सवयी विषयी माहिती होते. मध्यंतरी त्याने पायावर ब्लेडने वार केले होते.

 

पुढील स्लाईडवर आणखी फोटो आणि माहिती..

बातम्या आणखी आहेत...