आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

पुणे-नाशिक महामार्गावरील घाटात आढळला मनुष्याचा सापळा, परिसरात खळबळ

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

पुणे- पुणे ग्रामीण परिसरामध्ये दिवसेंदिवस गुन्हेगारीचे स्वरूप वाढतच असल्याचे दिसून येत आहे. वाढत्या गुन्हेगारीच्या घटनांमुळे परिसरात भीतीचे वातवरण निर्माण झाले आहे. बुधवारी सकाळी पुणे-नाशिक महामार्गावरील जंगलात मानवी हाडांचे अवशेष आढळून आले आहेत.  


पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, पुणे-नाशिक महामार्गावरील खेड घाटात जंगलामध्ये अज्ञात मानवी शरिरातील हाडे, कवटी, जबडा असे अवशेष आढळून आले. घटनेची माहिती मिळताच खेड पोलीस घटनास्थळी दाखल झाले आणि ही हाडे तपासणीसाठी पाठविण्यात आली आहे. अहवाल आल्यानंतरच ही हत्या की आत्महत्या याचा उलगडा होऊ शकतो. मानवी शरीराची हाडे सापडल्याने ही हत्या असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. तसेच, मृत व्यक्तीची व्यक्तीची ओळख पाठविण्याचे काम सुरू असून पोलिस घटनेचा तपास करीत आहे.

बातम्या आणखी आहेत...