आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

क्षुल्लक कारणावरुन पुण्यात सख्ख्या भावाची दगडाने ठेचून निर्घृण हत्या

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

पुणे- पत्र्याच्या शेडवरील पाणी घराच्या भिंतीवर पडत असल्याच्या क्षुल्लक कारणावरून सख्ख्या भावाची दगडाने ठेचून निर्घृण हत्या करण्‍यात आली आहे. पुण्यातील मावळच्या माळवाडी येथे ही धक्कादायक घटना काल (शुक्रवार) घडली. आहेत. राजू केदारी असे हत्या झालेल्या व्यक्तीचे नाव असून कैलास केदारी आणि मुलगा अमर केदारी अशी आरोपींची नावे आहेत.

 

काय आहे हे प्रकरण..?

- लहान भावाच्या घरातील पडवीच्या शेडच्या पत्र्याचे पाणी मोठ्या भावाच्या घराच्या भिंतीवर पडते. यावरून अनेक दिवसांपासून दोन्ही भावांमध्ये वाद सुरू होता. शु्क्रवारी हा वाद विकोपाला गेला. यातून कैलास आणि अमर या बापलेकाने मुलाच्या लोखंडी रॉड आणि दगडाने ठेचून मोठ्या भावाची हत्या केली.

-हे भांडण घराच्या पत्र्यावर झाल्याने, मृतदेह देखील तिथेच पडून होता. याप्रकरणी तळेगाव एमआयडीसी पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल झाला आहे. दोन्ही आरोपी फरार असून पोलिस त्यांंचा शोध घेत आहेत.

 

पुढील स्लाइड्‍सवर क्लिक करून पाहा... घटनेची फोटो...

बातम्या आणखी आहेत...