आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जुन्या पुणे-मुंबई महामार्गावर दुभाजकाला कार धडकल्याने झालेल्या अपघातात एकाचा मृत्यू

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अपघातात मृत्यू झालेले पुण्यवान बबन शिंदे. - Divya Marathi
अपघातात मृत्यू झालेले पुण्यवान बबन शिंदे.

पुणे- जुन्या पुणे-मुंबई महामार्गावर सोमाटणे गावच्या परिसरात दुभाजकाला धडकून मारुती झेन कारचा अपघात झाल्याची घटना घडली आहे. ही घटना काल मध्यरात्री साडेबाराच्या सुमारास घडली आहे. यामध्ये चालकाचा जागीच मृत्यू झाला आहे. पुण्यवान बबन शिंदे (वय 28, रा. दत्तवाडी, शिवणे ता. मावळ, जिल्हा पुणे) असे मृत्यू झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. 

 

 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, जुन्या पुणे मुंबई महामार्गावर  शिंदे आपल्या मारुती झेन कारने (क्र. MH14, H7782) हा महामार्गावरून शिवणे गावी जात असताना सोमाटणे गावच्या हद्दीत सतीश कार्गो येथे भजनसिंग ढाब्याजवळ दुभाजकाला धडकली आणि विरुद्ध दिशेला जाऊन खड्डयात पडली.  या अपघातात त्याच्या डोक्याला जबर मार लागल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला. घटनेची माहिती मिळताच महामार्ग पोलिस घटनास्थळी दाखल झाले . पुढील तपास तळेगाव पोलिस करीत आहेत.

 

 

पुढील स्लाईडवर आणखी फोटो आणि माहिती

बातम्या आणखी आहेत...