आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पुणे मुंबई एक्सप्रेस-वे वर लांब घसरत गेली कार; टायर फुटल्याने अपघात

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

पुणे- मुंबई द्रुतगती महामार्गावर मळवली गावच्या हद्दीत कारचा टायर फुटल्याने भीषण अपघात झाला आहे. मात्र या भीषण अपघातात सुदैवाने जीवित हानी टळली आहे. ही घटना आज संध्याकाळी घडली आहे. 

 

मिळालेल्या माहितीनुसार, पुण्याकडून मुंबईकडे एक कुटुंब हुंडाई कार (नं.व्ही-5 सीए -3601)मधून जात होते. मळवली  जवळ अचानक कारचा पुडील टायर फुटला आणि वेगात असलेली कार रस्त्यावर घासत काही अंतर पुढे जाऊन थांबली. हुंडाई कारचा पुडील टायर फुटल्याने हा भीषण अपघात झाला. दैव बलवत्तर म्हणून फक्त कारचे नुकसान झाले असून सुदैवाने कारमधील सर्व प्रवाशी सुखरूप आहेत. घटनेची माहिती मिळताच महामार्ग पोलीस तातडीने घटनास्थळी दाखल झाले. अपघातामुळे काही काळ वाहतूक विस्कळीत झाली होती. मात्र काही मिनिटातच वहातुकीस रस्ता मोकळा करून देण्यात आला आला.

बातम्या आणखी आहेत...