आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पुण्यात आई-वडील सांभाळत नसल्याने चिमुकल्यांचा मुक्काम पोलिस ठाण्यात

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

पुणे- एकीकडे आई-वडिलांना मुले सांभाळत नाहीत म्हणून मुलांवर गुन्हा दाखल होतो. मात्र दुसरीकडे निगडी येथे आई वडीलच आपल्या चिमुकल्या मुलीला आणि मुलाला सांभाळत नसल्याचा प्रकार समोर आला आहे. मागील 3 दिवसांपासून या दोन चिमुकल्यांचे घर हे निगडी पोलिस स्टेशन झाले आहे. निगडी पोलिस स्टेशनमध्ये आई-वडील विरोधात तक्रार दाखल करण्यात आली आहे. आई-वडिलांना अटक करण्यात आली आहे.

 

 

असे आहे प्रकरण

राजेश जयसिंग भोसले (वय 39, स्वप्नपूर्ती बिल्डिंग, पंचतारानगर, आकुर्डी ) आणि प्रतिभा राजेश भोसले (वय 34, सेक्क्टर 21, स्कीम नं. 10 बिल्डिंग 20, यमुनानगर ) असे या आई आणि वडिलांचे नाव आहे. पिंपरी-चिंचवड मधील राहणाऱ्या प्रतिभा आणि राजेश यांच्या विवाहानंतर  समृद्धी राजेश भोसले (वय 10 वर्ष )  आणि एक 4 ते 5 वर्षीय मुलगा अशी दोन अपत्ये त्यांना झाली. त्यानंतर समृद्धीला सांभाळण्याची दोघांची तयारी नसल्याने आणि घरातील खासगी भांडणामुळे मुलीचा उदरनिर्वाहाचा प्रश्न निर्माण झाला आहे, आई आणि वडिलांनी मुलीची देखभाल करणार नाही म्हणत स्टेशन येथे सोडून गेले आहे. त्यानंतर गेल्या तीन दिवसांपासून निगडी पोलिस देखील या आई-वडिलांना समजावून बेजार झाले आहेत. स्वतःच्या पोटच्या मुलीला सांभाळायला आई आणि वडील दोघेही तयार नाही. वडिलांचे म्हणणे आहे की, जर आई आणि मुलगी दोघे येणार असतील तर त्यांची जवाबदारी स्वीकारतो अन्यथा मुलगी नको. मात्र दुसरीकडे आई प्रतिभा (आई) गृहिणी असल्या कारणाने माझ्याकडे मुलीला सांभाळायला पैसे नाही असे म्हणत मुलीला सांभाळण्यासाठी नकार देत आहे .अखेर पोलीस हवालदार यांनी या आई-वडीलांच्या विरोधात तक्रार दिल्यानंतर त्या दोघांना अटक करण्यात आली. मात्र  निष्पाप मुलगी 3 दिवसांपासून निगडी पोलिस स्टेशन येथे राहत आहे. तिचा आणि तिच्या भावाचा सांभाळ हे निगडी पोलिस स्टेशन येथील अधिकारी करीत आहेत. आई-वडील जेलमध्ये असल्याने या मुलीचे करायचे काय असा प्रश्न निगडी पोलिसांसमोर उभा राहिला आहे. 

त्यानंतर गेल्या तीन दिवसांपासून निगडीचे वरिष्ठ पोलिस अधिकारी विजय पळसुले , पी आय औताडे आणि इतर स्टाफ त्यांचा सांभाळ करीत आहे. या दोन्ही भांवडांचं निगडी पोलिस स्टेशन हेच घर झाले आहे. हे दोघे चिमुकले पोलिस स्टेशनच्या आवारत खेळत असून राहत आहेत. मात्र या चिमुकल्यांचे काय होणार अशी चिंता देखील व्यक्त करण्यात येत आहे.

 

 

पुढील स्लाईडवर आणखी फोटो आणि माहिती

बातम्या आणखी आहेत...