आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आईचा सांभाळण्यास नकार, मुलांचा ताबा अखेर वडिलांकडे

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
निगडी पोलिस ठाण्यात खेळत असलेले चिमुकले. - Divya Marathi
निगडी पोलिस ठाण्यात खेळत असलेले चिमुकले.

पुणे- मुलांचा सांभाळ करण्यास असमर्थता दर्शवत दाेन मुलांना अार्इ-वडिलांनीच निगडी पाेलिस ठाण्यात अाणून सोडल्याची घटना घडली हाेती. पाेलिसांनी पालकांची समजूत काढूनही ते मुलांचा सांभाळ करण्यास नकार देत असल्याने पाेलिसांनी त्यांच्याविरोधात गुन्हा दाखल करून त्यांना अटक केली हाेती. या दांपत्याला पाेलिसांनी न्यायालयात हजर केले असता न्यायालयातही अार्इने मुलांचा सांभाळ करण्यास नकार दर्शवल्याने न्यायालयाने मुलांची जबाबदारी वडिलांकडे दिली अाहे.    


राजेश जयसिंग भाेसले (३९) व प्रतिभा राजेश भाेसले (३४, रा.यमुनानगर, निगडी, पुणे) असा याप्रकरणी गुन्हा दाखल झालेल्या अार्इवडिलांचे नाव अाहे. हे दांपत्य मुलगा सांभाळण्यास तयार हाेते. मात्र, मागील काही दिवसांपासून मुलगी सांभाळण्यावरून त्यांच्यात वाद सुरू हाेते. ही भांडणे टाेकास जाऊन दाेघांनी मुलांची जबाबदारी घेणार नसल्याचे स्पष्ट केले. त्यामुळे यापुढील काळात मुले नेमकी काेण सांभाळणार यावरून त्यांच्यात वाद हाेऊन तीन दिवसांपूर्वी ते दहा वर्षांची मुलगी समृद्धी  अाणि पाच वर्षांचा मुलगा शाैर्य यांना घेऊन निगडी पाेलिस ठाण्यात दाखल झाले. मुलांचा सांभाळ अाम्ही करू शकत नाही, असे सांगत दाेघांनी जबाबदारी झटकण्याचा प्रयत्न केल्याने पाेलिसांसमाेरही बिकट प्रसंग निर्माण झाला. पतीने मुलांच्या पालनपाेषणासाठी पुरेसे पैसे द्यावेत, अशी प्रतिभाची मागणी हाेती. पाेलिसांनी दांपत्याला अशा प्रकारे वागणे याेग्य नाही, असे सांगत त्यांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला. मात्र, दाेघांनी मुले सांभाळण्यास तयार नसल्याचे सांगत तीन दिवसांपूर्वी त्यांचा परित्याग केला. या घटनेने खळबळ उडाली होती.

 

...आणि पोलिसांनी सोडला सुटकेचा नि:श्वास  
अखेर पाेलिसांनी दाेघांविराेधात गुन्हा दाखल करून त्यांना अटक केली. न्यायालयात दाेघांना हजर करण्यात अाले असता न्यायालयाने मुलांचा सांभाळ करणार की नाही, अशी विचारणा पालकांना केली. त्यावर मुलांच्या आईने नकार दिला. त्यामुळे न्यायालयाने मुलांची जबाबदारी वडिलांकडे दिली. अखेर वडिलांसाेबत मुले घरी परतली असून पाेलिसांनी सुटकेचा नि:श्वास साेडला अाहे.  

 

पुढील स्लाईडवर आणखी फोटो आणि व्हिडीओ...

बातम्या आणखी आहेत...