आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पुण्यात किरकोळ वादातून चार महिलांना लोखंडी रॉडने मारहाण; घटना CCTV त कैद

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

पुणे- देहूरोडमध्ये किरकोळ वादातून झालेल्या मारहाणीत चार महिलांना लोखंडी रॉडने बेदम मारहाण केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी परस्पर विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

 

 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सोनू शेख मारहाण झालेल्या फिर्यादी यांचा मुलगा आणि नागेश रेड्डी यांचे मोबाईलचे दुकान हे शेजारी शेजारी असून ते राहण्यासाठी देखील शेजारी आहेत. त्यांची नेहमीच किरकोळ कारणावरून भाडंण व्हायची मात्र रात्री अबूशेट रोड येथील मोबाईलच्या दुकानावर वाद विकोपाला गेला. नागेश रेड्डी याने पेट्रोलची बाटली फिर्यादी सायिदा शेख यांच्या मुलाच्या दुकानावर भिरकावली. यात दुकानाने पेट घेतला. मात्र वेळीच आग विझवली. याचा जाब विचरण्यासाठी फिर्यादी जायिदा शेख गेल्या होत्या. नागेश रेड्डीसह दोघांनी जुबेदा शेख,फिर्यादी जायीदा शेख,सईद नबिब शेख,सबदसुग खान या महिलांना लोखंडी रॉडने बेदम मारहाण केली. यात त्या गंभीर जखमी झाल्या. त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या प्रकरणी राकेश लोकेश रेड्डी आणि राजू अपन्ना रेड्डी याना अटक करण्यात आली आहे. त्यांना 26 तारखेपर्यंत पोलिस कोठडी मिळाली आहे. या घटनेबाबत परस्पर विरोधी गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. तपास देहूरोड पोलिस करत आहेत.

 

 

पत्रकारांना माहिती देण्यास पोलिसांची टाळाटाळ

अगोदर हे प्रकरण दडपण्याचा प्रयत्न देहूरोड पोलिसांकडून होत असल्याची चर्चा होती. याविषयी पोलिस निरीक्षक अरुण मोरे यांनी माहिती देण्यास टाळाटाळ केली. पत्रकारांना माहिती देत बसू की काम करू असे ते म्हणाले. पण वरिष्ठांचा फोन आल्यावर त्यांनी माहिती दिली.

 

 

पुढील स्लाईडवर आणखी फोटो, व्हिडीओ आणि माहिती

बातम्या आणखी आहेत...