आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सायबर सिक्युरिटी भविष्यातील सर्वात मोठे आव्हान, तज्ज्ञांची गरज- मुख्यमंत्री

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

पुणे- राज्यात घडणाऱ्या एकूण गुन्ह्यात रस्त्यावरील गुन्हे आणि शरीरिक गुन्हे यांचे प्रमाण पूर्वी मोठे असायचे. मात्र, माहिती-तंत्रज्ञानाच्या युगात आर्थिक गुन्ह्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत असून सायबर गुन्हयांचा सामना करणे पुढील काळात आव्हान अाहे. त्यादृष्टीने सायबर सिक्युरीटीकरिता माेठया प्रमाणात प्रशिक्षित मनुष्यबळाची गरज असून त्यादृष्टीने प्रयत्न करण्यावर भर दिला पाहिजे असे मत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बुधवारी व्यक्त केले. 

 

सिंबायाेसिस लाॅ स्कुलच्या दहावा अांतर महाविद्यालयीन वार्षिक सांस्कृतिक महाेत्सवाचे उदघाटन प्रसंगी ते बाेलत हाेते. यावेळी सामाजिक न्याय राज्यमंत्री दिलीप कांबळे, खासदार अनिल शिराेळे, अामदार जगदीश मुळिक, सिंबायाेसिसचे संस्थापक डाॅ.शां.बा.मुजुमदार, संचालिका डाॅ.विद्या येरवडेकर, रजनी गुप्ते, डाॅ.शशीकला गुरपुर उपस्थित हाेते. 

 

मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, अाैद्याेगिक प्रगतीसाठी अाणि राेजगारासाठी मॅग्नेटिक महाराष्ट्राचे अंतर्गत एक ट्रिलियन डाॅलरची राज्याची अर्थव्यवस्था करण्याचे लक्ष्य निश्चित करण्यात अाले अाहे. उत्पादन अाणि सेवा यांचे विभाजन न करता, एकत्रितपणे त्यांचा विचार करुन संशाेधनला प्राेत्साहन देण्यावर सरकारचा भर अाहे. सन 2020 मध्ये भारत हा जगातील सर्वधीक युवाशक्ती असणारा देश हाेणार अाहे. त्यादृष्टीने सदर मनुष्यबळाला चांगल्याप्रकारे प्रशिक्षित केल्यास जगाला मनुष्यबळ अापण पुरविण्यास समर्थ हाेऊ. ‘वसुधैव कुटुंबकम’ ही अापली संस्कृती असून देशावर अनेक राजे, सत्ता यांनी येवुन अाक्रमण केले. मात्र, त्यांना अापल्या संस्कृतीने सामावून घेत त्यांच्यातील चांगले ज्ञान घेण्याचा प्रयत्न केला हे भारतीय संस्कृतीचे वैशिष्टे अाहे. 

बातम्या आणखी आहेत...