आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

valentine day: पुण्यात ‘कपल गार्डन’ची 'राईट टू लव्ह' संघटनेची मागणी

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सांकेतिक फोटो. - Divya Marathi
सांकेतिक फोटो.

पुणे- 'आयटी' हब असलेल्या पुणे शहरात कपल गार्डनही असावे अशी मागणी ‘राईट टू लव्ह’ या संघटनेने केली आहे. प्रेम करणे हा प्रत्येक व्यक्तीचा मुलभूत अधिकार आहे, त्याला तो मिळायलाच हवा, असे या संघटनेचे मत आहे. घटनेच्या वर्धापनदिनाच्या तसेच ‘व्हॅलेंटाईन डे’च्या निमित्ताने ही मागणी  करण्यात आली आहे.

 

 

संस्कृती रक्षकांकडून त्रास?

संस्कृतीच्या नावाखाली अनेक व्यक्ती आणि संघटनांकडून ‘व्हॅलेंटाईन डे’ला विरोध होताना दिसतो. प्रेमाचा आणि ते करणाऱ्याचा सन्मान व्हायला हवा. शहरात सर्व प्रकारच्या सोयीसुविधा आहेत. मात्र याठिकाणी प्रेम करणाऱ्यांसाठी सुरक्षित ठिकाणे नाहीत. यामुळे ही जोडपी शहराच्या ठिकठिकाणी बसलेली दिसतात. पण त्याबाबतही संस्कृती रक्षकांकडून विरोध होताना दिसतो. परंतु प्रेम करणे हा अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा भाग आहे. तो व्यक्त करण्यासाठी विशिष्ट ठिकाणाची आवश्यकता असल्याचे संघटनेचे म्हणणे आहे. याबाबतचे पत्र संघटनेच्या अधिकाऱ्यांनी महापालिकेला दिले आहे. असे गार्डन व्हावे अशी मागणी केली आहे. 

 

 

पुढील स्लाईडवर आणखी फोटो आणि माहिती

बातम्या आणखी आहेत...