आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पुण्यात भरदिवसा कोयत्याचा धाक दाखवून ज्वेलर्सच्या दुकानातून दागिने पळवले

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

पुणे- साेमवार पेठेतील पायल गाेल्ड या सराफी दुकानात भरदिवसा बुधवारी दुपारी चार वाजण्याचे सुमारास अनाेळखी चार चाेरटयांनी शिरुन काेयत्याचा धाक दाखवत 400 ग्रॅम वजनाची साेन्याची चार बिस्किटे व राेख 30 हजार रुपयांची रक्कम पळवून नेली अाहे. चाेरटयांचा पाठलाग करणाऱ्या दुकानातील कर्मचाऱ्यावर चाेरटयांनी काेयता फेकून मारल्याचा प्रकार घडला अाहे.

 

पायल गाेल्ड दुकान लाॅइड एडमं यांच्या मालकीचे असून बुधवारी दुपारी दाेन कामगार दुकानात हाेते. दुपारी साडेतीन वाजण्याचे सुमारास एक कामगार जेवण करण्याकरिता बाहेर गेला हाेता. त्यावेळी चार चाेरटे काेयता हातात घेऊन दुकानात शिरले. त्यांनी दुकानातील कर्मचाऱ्यास धमकावत, दुकानातील साेन्याची बिस्किटे व राेख रक्कम पळवून नेली.

 

घटनेची माहिती मिळताच,पाेलीस घटनास्थळी दाखल हाेऊन त्यांनी अाराेपींचा शाेध सुरु केला अाहे. सराफ दुकानातील सीसीटीव्हीत घडलेला थरारक प्रकार कैद झाला असून त्याअाधारे चाेरटयांचा माग काढण्याचा प्रयत्न करण्यात येत अाहे. फरासखाना पाेलीस याबाबत पुढील तपास करीत अाहे.  

बातम्या आणखी आहेत...