आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ठेवीदारांचे पैसे परत करण्यासाठी डीएसकेंचे क्राउड फंडिंग;पुन्हा लाेकांमधूनच पैसे गाेळा करणार

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

पुणे- हजाराे ठेवीदारांचे पैसे परत करण्यासाठी न्यायालयाने अखेरची मुदत दिल्यानंतर पुण्यातील बिल्डर डी.एस. कुलकर्णी यांनी युद्धपातळीवर हालचाली सुरू केल्या अाहेत. तातडीने मालमत्ता विक्री करून पैसे उभे राहत नसल्यामुळे अखेर त्यांनी पुन्हा लाेकांकडूनच पैसे उभे करण्याचा निर्णय घेतला अाहे. ‘अाजवर सामान्य लाेकांच्या मदतीमुळेच मी माेठा झालाे. परदेशात एखाद्या विशिष्ट कार्याला लाेक स्वत:हून पैसे देतात, तशाच ‘क्राउड फंडिंग’ याेजनेद्वारे अाताही मला सर्वसामान्य लाेकांनी पाठबळ द्यावे,’ अशी भावनिक साद कुलकर्णी यांनी गुरुवारी पत्रकार परिषदेद्वारे घातली अाहे.   


ठेवीदारांचे लाखाे रुपये परत न केल्यामुळे डीएसके व त्यांच्या पत्नीविराेधात गुन्हा दाखल अाहे. न्यायालयाने त्यांना पैसे परतफेडीसाठी १३ फेब्रुवारीपर्यंत अंतिम मुदत दिली अाहे. या पार्श्वभूमीवर डीएसके म्हणाले, ‘अाज अनेक लाेक माझ्या मदतीसाठी पुढे येत अाहेत. मी काेणालाही फसवणार नाही, अशी खात्री अाजही अनेकांना अाहे. त्यामुळेच या वर्गासाठी मी ‘क्राउड फंडिंग’च्या माध्यमातून एक प्लॅटफाॅर्म उभा करून देत अाहे. चांगले काम करणाऱ्या व्यक्तीला अडचणीच्या काळात मदतीसाठी समाज पुढे यावा, ही संकल्पना अापल्याकडे रुजावी म्हणून मी ‘क्राउड फंडिंग’ ही याेजना राबवत अाहे. ’ दरम्यान, ग्लाेबल सेतूच्या माध्यमातून डीएसके समूहाला निधी उभारण्यास मदत करण्यात येर्इल, असे मंदार जाेगळेकर यांनी सांगितले.    


भीक नकाे, मदत हवी : डीएसके  
डीएसके म्हणाले, ‘अाठ हजार गुंतवणूकदार, अडीच हजार फ्लॅटधारक, महाविद्यालयातील ६५० विद्यार्थी, फुटबाॅल अकादमीतील ३५० खेळाडू,  विश्व स्कूलमधील ७०० विद्यार्थी, मध्य प्रदेशातील बायाेमेट्रिकचे हजाराे कर्मचारी असे सुमारे एक ते दीड लाख लाेक डीएसके समूहावर अवलंबून अाहेत. माझ्याकडील भांडवल संपले असले तरी माेठी स्थावर मालमत्ता अाहे. जमीन विक्रीतूनही पैसे उभारण्याचा अखेरचा पर्याय अाहे. डीएसके भीक मागत नाही मात्र, पुन्हा उभा राहण्याकरिता नागरिकांनी मदत करावी, एवढीच अपेक्षा अाहे.’

बातम्या आणखी आहेत...