आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भिमाशंकर येथील 6 व्या ज्योतिर्लिंगाचे दर्शन; पाहा VIDEO

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

पुणे- बारा ज्योतिर्लिंगापैकी एक असणाऱ्या भिमाशंकर ज्योतिलिंगाच्या दर्शनासाठी आज भाविकांनी मध्यरात्रीपासून गर्दी केली आहे. या ज्योतिर्लिंगामधून भीमा नदी उगम पावते. सह्याद्रीच्या पर्वतरांगांमध्ये असलेल्या या मंदिराच्या भोवती घनदाट जंगल आहे. आज महाशिवरात्रीच्या पर्वानिमित्त भाविकांनी मोठ्या प्रमाणावर दर्शनासाठी गर्दी केली होती.

 

 

ते सह्याद्रीच्या कुशीत वसलेले असून महाशिवरात्रीनिमित्ताने राज्याच्या कानाकोपऱ्यातून लाखो भाविकांनी येथे गर्दी केली आहे. मोठ्या संख्येमध्ये भक्तांनी श्री शंभू महादेवाच्या दर्शनासाठी रांगा लावल्या आहेत. मध्यरात्री शासकीय महापुजेनंतर भाविकांना दर्शनासाठी मंदिर खुले करण्यात आले. भिमाशंकर हे भारतातील 12 जोर्तिंलिंगापैकी सहावे जोर्तिंलिंग आहे. हे मंदिर पुरातन व हेमांडपंथी पद्धतीचे असून मंदिरात शंकर पार्वतीचे एकत्र असलेले शिवलिंग केवळ भीमाशंकर येथेच आहे. काही अनुचित प्रकार घडू नये यासाठी प्रशासनाकडून कडेकोट सुरक्षाव्यवस्था तैनात करण्यात आली आहे.

 

 

पुढील स्लाईडवर व्हिडीओ

बातम्या आणखी आहेत...