आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ज्येष्ठ नाटककार दिलीप कोल्हटकरांच्या पत्नीचा घरातच संशयास्पद मृत्यू

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पुणे-  ज्येष्ठ नाटककार दिलीप कोल्हटकर यांच्या पत्नी दीपाली कोल्हटकर (६५) यांचा संशयास्पद मृत्यू झाला. कर्वेनगरमधील घरातील स्वयंपाकघरात गुरुवारी रात्री त्या अर्धवट जळालेल्या अवस्थेत आढळल्या. रुग्णालयात दाखल केले असता डाॅक्टरांनी त्यांना मृत घाेषित केेले. शवविच्छेदनात त्यांच्या डोक्याला गंभीर जखम असल्याचे आढळले. याप्रकरणी खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कोल्हटकर हे पत्नी व सासूसह राहतात. त्यांच्याकडे २ नोकर आहेत. दिलीप व त्यांच्या सासू अाजारीपणामुळे अंथरुणाला खिळून असतात. स्वयंपाकघरातून गुरुवारी रात्री धूर निघू लागल्याने शेजाऱ्यांनी दार उघडून पाहिले असता दीपाली  या जळालेल्या अवस्थेत आढळल्या.
बातम्या आणखी आहेत...