आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पुणे: दिपाली कोल्हटकरांच्या मारेक-याला 16 तारखेपर्यंत पोलिस कोठडी, आरोपी 19 वर्षाचा

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

पुणे- प्रसिध्द नाटककार दिलीप काेल्हटकर यांची पत्नी दिपाली काेल्हटकर (वय-65) यांच्या खून प्रकरणी आरोपी किसन मुंडे (वय-19, रा. भूम, उस्मानाबाद) याला कोर्टाने 16 तारखेपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे. या प्रकरणी कोल्हटकर कुटुंबियांचा केअर टेकर किसन यानेच दिपाली यांची हत्या केल्याचे पोलिस तपासात समोर आले आहे.

 

दिपाली कोल्हटकर यांचा राहत्या घरात किचनमध्ये अर्धवट जळालेल्या अवस्थेत मृतदेह गुरुवारी रात्री उशिरा (8 फेब्रुवारी) अाढळून अाला हाेता. गुरुवारी रात्री साडेअाठ वाजण्याच्या सुमारास काेल्हटकर यांच्या घरातून धूर निघू लागल्याने शेजाऱ्यांनी धाव घेतली असता, त्यांना किचन मध्ये अर्धवट जळालेल्या अवस्थेत दिपाली काेल्हटकर यांचा मृतदेह मिळून अाला.

 

याप्रकरणी शवविच्छेदन अहवालात दिपाली काेल्हटकर यांचा गळा दाबून तसेच डाेक्यात काेणती तरी वस्तू मारल्याने गंभीर इजा झाल्याचे स्पष्ट झाल्यानंतर पाेलिसांनी अज्ञात व्यक्तीवर खुनाचा गुन्हा दाखल केला होता. याप्रकरणी काेल्हटकर यांच्या खुनाचा नेमका उद्देष अद्याप स्पष्ट न झाल्याने पाेलीसांच्या तपासाला अजून दिशा मिळू शकलेली नाही. मात्र, किसन मुंडे यानेच हा खून केल्याचे उघड झाले आहे.

 

याप्रकरणी काेल्हटकर यांचे जावर्इ ऋषिकेश चंद्रात्रेय यांनी अलंकार पाेलीस ठाण्यात तक्रार दिली होती. सुरुवातीला पोलिसांनी याप्रकरणी अकस्मात मयत अशी गुन्हयाची नाेंद केली हाेती. मात्र, शवविच्छेदन अहवालात त्यांचा खून झाल्याचे स्पष्ट झाल्यानंतर पाेलिसांनी अज्ञात व्यक्ती विराेधात खुनाचा गुन्हा दाखल केला.

 

दिलीप काेल्हटकर हे त्यांची पत्नी व 88 वर्षीय सासु साेबत गुळवणी महाराज रस्त्यावरील मिथाली काे-अाॅपरेटिव्ह साेसायटीत फ्लॅट क्रमांक तीन मध्ये राहतात. दिलीप काेल्हटकर हे अाजारपणामुळे मागील तीन वर्षापासून अंथरुणाला खिळून अाहेत. त्यांचा मुलगा अनवय काेल्हटकर हा नाेकरी निमित्त अमेरिकेत असताे. तर त्यांची मुलगी केतकी हिचा विवाह झाला असून ती अलंकार परिसरातच राहते. काेल्टकर यांच्या घरात दिवसा अाणि रात्री दाेन केअरटेकर काम करतात. 

बातम्या आणखी आहेत...