आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करापुणे- शेजारणीने अाणून दिलेल्या काॅफीतील एक कप काॅफी दीपाली काेल्हटकर यांनी दिली नाही तसेच त्यांच्या अमेरिकेतील मुलाकडे सतत अापल्या खाण्याबाबत त्या तक्रारी करत असल्याच्या रागातून काेल्हटकर यांचा खून केल्याची कबुली अाराेपीने दिली अाहे. किसन मुंडे (१९, रा.भूम) असे आरोपीचे नाव असून त्याला न्यायालयाने १६ फेब्रुवारीपर्यंत पाेलिस काेठडी सुनावली आहे.
प्रसिद्ध नाटककार दिलीप काेल्हटकर हे त्यांची पत्नी दीपाली व सासू अाशा सहस्रबुद्धे यांच्यासह कर्वेनगर परिसरात राहतात. गेल्या तीन वर्षांपासून दिलीप काेल्हटकर हे अाजारपणामुळे अंथरुणाला खिळून असून त्यांच्या सासूही थकलेल्या आहेत. घरातील देखभालीसाठी दिवस आणि रात्रपाळीत दाेन केअरटेकर त्यांनी ठेवलेले अाहेत, तर त्यांची मुलगी केतकी चंद्रात्रे ही कर्वेनगर परिसरातच राहण्यास असून मुलगा अन्वय हा नाेकरीनिमित्त अमेरिकेत स्थायिक झाला अाहे. मुलगा व मुलगी हे दरराेज त्यांची फाेन आणि व्हिडिअाे काॅलिंगवर चाैकशी करत हाेते. गेल्या तीन दिवसांपासून त्यांच्या घरात दिवसपाळीवर काम करत असलेला केअरटेकर कैलास हा सुटीवर असल्याने त्याच्या जागी किसन मुंडे हा बदली कामगार म्हणून अाला हाेता. घटनेच्या दिवशी काेल्हटकर यांच्या शेजारणीने त्यांना काॅफी करून अाणून दिली हाेती. या काॅफीतील थाेडी काॅफी आपल्याला दिली नाही म्हणून त्याने स्वयंपाकघरात जाऊन दीपाली यांना काॅफी मागितली. त्या वेळी त्यांनी कॉफी देण्यास त्याला नकार दिला. त्यामुळे किसन याने रागाच्या भरात गळा दाबून त्यांचा खून केला. तसेच पेटत्या निरंजनीतून कागद पेटवून ताे दीपाली यांच्या अंगावर टाकला, त्यात त्यांच्या साडीने पेट घेतला.अंथरुणाला खिळून असलेले दिलीप यांना काहीतरी अघटित घडल्याचा संशय अाला. त्यांनी पाय अापटले. ते एेकून टीव्ही पाहात असलेल्या दीपाली यांच्या अाई खाेलीतून बाहेर अाल्या. त्यांनी किसनकडे विचारपूस केली. मात्र काहीही झाले नाही, काकू (दीपाली) बाहेर गेल्या असल्याचे सांगितले. त्यामुळे त्या पुन्हा मालिका पाहण्यास खाेलीत गेल्या. मात्र, रात्री स्वयंपाकघरातून धूर येऊ लागल्याने त्यांनी अारडाअाेरड करत शेजाऱ्यांना बाेलवले. शेजाऱ्यांनी स्वयंपाकघरात जाऊन पाहिले असता, दीपाली यांचा अर्धवट जळालेल्या अवस्थेतील मृतदेह त्या ठिकाणी पडलेला हाेता. सुरुवातीला अकस्मात मृत्यूची नाेंद करण्यात अाली हाेती.
खाण्यापिण्याचा हव्यास
नोकर किसनला सातत्याने भूक लागत असल्याने ताे दीपाली यांच्याकडे वेळाेवेळी चहा, नाष्ट्याची मागणी करत हाेता. मात्र, घरात सर्वजण ज्येष्ठ असल्याने त्यांचे खाणे कमी हाेते व किसनला दिवसातून दाेन वेळाच चहा मिळेल असे सांगण्यात अाले. किसन हा घरात काही काम करत नाही, त्याला चांगला स्वयंपाक येत नाही. मात्र, खाण्याची सतत मागणी करत राहताे, अशी तक्रार दीपाली यांनी मुलाकडे केली होती. कॉफीच्या हव्यासापोटी किसनने दीपाली यांचा खून केला.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.