आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पुण्यात पिंपरी-चिंचवडच्या रामनगर परिसरात 11 वाहनांची तोडफोड; 9 दिवसात तिसरी घटना

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

पुणे- चिंचवड येथील रामनगर परिसरात टोळक्याने 11 वाहनांची तोडफोड केली आहे. पिंपरी-चिंचवड परिसरात 17 वाहनांची तोडफोड करण्यात आली होती. या घटनेला 24 तास उलटत नाहीत तोच ही घटना घडली. याप्रकरणी सागर नलावडे आणि सागर भिसे याना पिंपरी पोलिसांनी अटक केली आहे.

 

 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सागर सातकर आणि पप्प्या उर्फ विनोद पवार (दोघे रा.चिंचवड) यांचा रामनगर येथील तरुणाशी वाद झाला होता.याच वादातून काही वेळानंतर या दोघांसह नऊ जणांनी लोखंडी रॉड, कोयते या हत्यारांनी आणि लाकडी दांडके, सिमेंट गट्टूने रामनगर येथील रस्त्यालगत असलेल्या चारचाकी वाहनांची तोडफोड केली. यात मोठ्या प्रमाणावर वाहनांचे नुकसान झाले आहे. त्याचबरोबर हातात तलवार घेऊन दहशत माजविण्यात आली, फिर्यादी अण्णासाहेब शिरसाट यांच्याकडील अडीच हजार रुपये हिसकावून घेण्यात आले.

मात्र या घटनेमुळे रामनगर परिसर भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. नवीन वर्षातील ही तोडफोडीच्या तिसरी घटना आहे. त्यामुळे पोलिसांनी डोकेदुखी वाढली आहे. रामनगर तोडफोडी प्रकरणी सागर नलावडे (वय-29, रा.रामनगर) आणि सागर भिसे (वय-19) यांना पोलिसांनी अटक केली आहे. हे दोघेही बेरोजगार आहेत. अद्यापही आणखी नऊ जण फरार आहेत. त्यांचा शोध पिंपरी पोलिस घेत आहेत.

 

 

पुढील स्लाईडवर आणखी फोटो आणि माहिती

बातम्या आणखी आहेत...