आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

..अखेर डीएसके दांपत्य पुणे पाेलिसांसमाेर हजर; अाणखी पाच दिवस लावावी लागेल हजेरी

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

पुणे- प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक डी.एस.कुलकर्णी व हेमांगी कुलकर्णी यांनी पाेलिसांना चाैकशीकामी सहकार्य करावे, अशी उच्च न्यायालयाने तंबी दिल्यानंतर बुधवारी डीसके दांपत्य पुणे पाेलिस अायुक्तालयात चाैकशीसाठी हजर झाले. अार्थिक गुन्हे शाखेचे पाेलिस उपअायुक्त डाॅ.सुधीर हिरेमठ, सहायक पाेलिस अायुक्त नीलेश माेरे यांच्या उपस्थितीत डीएसके दांपत्याचा जबाब नोंदवण्यात आला. दरम्यान, पुढील पाच दिवस त्यांना पोलिस ठाण्यात हजेरी लावावी लागणार आहे.  


उच्च न्यायालयाने डीएसके यांना ५० काेटी रुपये जमा करा, असे अादेश दिले हाेते. मात्र, तीन वेळा मुदतवाढ देऊनही त्यांनी अद्यापही पैसे भरले नाहीत. १३ फेब्रुवारी राेजी न्यायालयाने डीएसके यांना न्यायालयात हजर राहण्याचे अादेश दिले असून गुंतवणूकदारांचे पैसे परत कधी करणार, याबाबत माहिती देण्याचे अादेश दिले अाहेत. तसेच उच्च न्यायालयाने डीएसके दांपत्यास अार्थिक गुन्हे शाखेत पुढील पाच दिवस चाैकशीसाठी हजर राहण्यास सांगितले अाहे. पाेलिसांनी एक तास काैटुंबिक अाणि व्यवसायाच्या अनुषंगाने वेगवेगळे प्रश्न दांपत्यास विचारले.  


३०० मालमत्ता उघडकीस   
अार्थिक गुन्हे शाखेने अातापर्यंत डीएसकेंच्या पुणे अाणि मुंबईतील ३०० मालमत्तांची माहिती घेतली अाहे. त्यांच्या सर्व मालमत्तांवर  कर्ज असल्याचे स्पष्ट झाले अाहे. परतफेड मुदतीत न केल्याने या मालमत्तावर बॅंकांनी नाेटिसाही काढलेल्या अाहेत. या सर्व गाेष्टीची माहिती पाेलिसांनी जिल्हाधिकारी कार्यालयास दिली अाहे. सदर अहवाल राज्य सरकारला सादर केला जाईल.   त्यानंतर शासन मालमत्तांची विक्री कशी करायची याबाबत ठरवेल. मालमत्ता विक्रीतून मिळणाऱ्या पैशांतून प्रथम बँकांची देणी दिली जातील व त्यानंतर गुंतवणूकदारांना त्यांचे पैसे मिळतील, अशी माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिली.

बातम्या आणखी आहेत...