आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ट्रम्प टॉवर्स उद्घाटनासाठी ज्यूनियर ट्रम्प पुण्यात: 15 कोटीला एक फ्लॅट, सेलेब्रिटीजची घरे

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
हा ट्रम्प टॉवर पुणयातील कल्याणीनगर स्थित आहेत. - Divya Marathi
हा ट्रम्प टॉवर पुणयातील कल्याणीनगर स्थित आहेत.

पुणे- अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा मुलगा डोनाल्ड ट्रम्प ज्यूनियर यांनी पुण्यातील कल्याणीनगरमध्ये उभारलेल्या ट्रम्प टॉवर्सच्या दुस-या बिल्डिंगमध्ये बुधवारी उद्घाटन केले. पंचशील डेव्हलपर्सच्या मदतीने उभारलेला हा देशातील दुसरा ट्रम्प टॉवर आहे. पंचशील ग्रुपचे चेयरमन अतुल चोरडिया यांनी दावा केला आहे की, 23 मजली ही इमारत सर्वात आलिशान आणि देशातील पहिली इको फ्रेंडली इमारत आहे. या बिल्डिंगमध्ये ऋषी कपूरपासून कॅटरीना कैफपर्यंतचे फ्लॅट्स आहेत. उपलब्ध माहितीनुसार, येथील एका फ्लॅट्सची किंमत 15 कोटी रुपये इतकी आहेत. जगातील सर्वोत्तमपैकी एक टॉवर...

 

- पुणे स्थित ट्रम्प बिल्डिंगमधील निर्माण करण्यासाठी स्तर आणि क्वालिटीचे कौतूक करताना डोनाल्ड ट्रम्प ज्यूनियर यांनी म्हटले की, आताच्या भारत दौ-यात मी माझ्यासोबत अमेरिकेतील माझे काही मित्र आणि बांधकाम क्षेत्रातील काही तज्ज्ञ घेऊन आलो आहे.
- या सर्वांचे एक मत बनले की, पुण्यातील या ट्रम्प टॉवर बिल्डिंगची तुलना जर इंग्लंड किंवा अमेरिकेतील इमारतींशी केली तर या दोन्ही देशापेक्षा येथील इमारत अनेक अर्थांनी गुणवत्तापूर्ण आहे.
- टम्प पुढे म्हणाले की, जर प्रगतशील देशांतील रियल इस्टेट कंपन्यांसोबत स्पर्धा करायची असेल तर त्यांनाही पंचशील ग्रुपचे कंस्ट्रक्शनसोबत स्पर्धा करावी लागेल.
- अतुल चोरडिया यांनी सांगितले की, 23 मजली ट्रम्प टॉवरमधील दोन्ही टॉवर्समधील फ्लॅट्स बुक झाले आहेत. टॉवर B मधील पहिल्या दोन खरेदीदारांना ट्रम्प ज्यूनियर यांच्या हस्ते टोकन ऑफ अप्प्रेसिएशन दिले गेले. 

 

काय आहे या खास प्रोजेक्टमध्ये?
 
- 23 मजली या टावर्सचा बाहेरचा भाग संपूर्णपणे ग्लासचा आहे.
- प्रत्येक मजल्यावर 6100 स्क्वेयर फुटाचा केवळ एकच फ्लॅट
- आधुनिक फिटनेस सेंटर
- आऊटडोर स्विमिंग पूल
- बायोमेट्रिक कार्डनेच फक्त एंट्री
- वर्ल्ड क्लास दर्जाचा स्पा
- 13,500 स्क्वेयर फुटाची आर्ट गॅलरी
- वर्ल्डक्लास सिक्यूरिटी सिस्टम.
 

ट्रम्प यांचा भारतातील पहिला प्रोजेक्ट-

 

- ही बिल्डिंग न्यूयॉर्कमधील रियल एस्टेट टायकून व राष्ट्राध्यक्ष डोनॉल्ड ट्रम्प यांची आहे. ट्रम्प यांचा हा भारतातील पहिलाच प्रोजेक्ट आहे. 
- ट्रम्प ब्रॅंडचा हा प्रोजेक्ट प्रसिद्ध बिल्डर ग्रुप पंचशील बनवित आहे. पंचशील ग्रुपने पुण्यात यापूर्वीही अनेक मोठे प्रोजेक्ट्स तयार केले आहेत.
- पुण्याशिवाय डोनॉल्ड ट्रम्पची कंपनी 'ट्रम्प ऑर्गेनायजेशन' ने मुंबईत लोढा ग्रुपसोबत भागीदारी केली आहे. लोढा ग्रुप मध्य मुंबईतील वरळी भागात 75 मजली रहिवासी टॉवर्स उभा करीत आहे.

- वरळीतील ट्रम्प टॉवर्समधील 400 फ्लॅट्‍सपैकी जवळपास बहुतेक फ्लॅट्स विकले गेले आहेत.
- ट्रम्प ऑर्गनायझेशनने काही भारतीय बिल्डर्सला स्वत:चे नाव वापरण्याचे लायसन्स दिले आहे.

 

ऋषी कपूर रणबीर कपूर पिता-पुत्राचे दोन फ्लॅट-

 

- अभिनेता ऋषी कपूर आणि रणबीर कपूर या पिता-पुत्रांनी पुण्यातील कल्याणीनगरमधील ट्रम्प टावर्स या अलिशान अपार्टमेंटमध्ये 6100 स्क्वेयर फुटांपेक्षा जास्त एरियात दोन फ्लॅट खरेदी केले आहेत. 
- कपूर पिता-पुत्रांनी यातील दोन फ्लॅट 26 कोटी रूपयांना खरेदी केले आहेत. 
- 23 मजली दोन टावर्सच्या अपार्टमेंटमध्ये प्रत्येक मजल्यावर केवळ एकच फ्लॅट आहे. दोन्ही टॉवर्समध्ये फक्त 46 फ्लॅट्स आहेत. 

 

ऋतिक रोशनची माजी पत्नी सुझानने खरेदी केलाय फ्लॅट-

 

- बॉलिवूड अभिनेता ऋतिक रोशन याची माजी पत्नी आणि इंटिरियर डेकोरेटर सुझान खानने ट्रम्प टॉवर्समध्ये 16 कोटी रूपयांना एक पेंटा हाऊस फ्लॅट खरेदी केला आहे. 
- 2014 मध्ये ऋतिक रोशनने पुण्यातील रियल एस्टेट सेक्टरमध्ये मोठी गुंतवणूक केली आहे.

 

पुढे स्लाईडद्वारे पाहा, पुण्यातील ट्रम्प टॉवर्समधील फोटोज....

बातम्या आणखी आहेत...