आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

एक कोटी रुपयांच्या अंमली पदार्थांचे काय करायचे? मग पोलिसांनी शोधला हा मार्ग

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अंमली पदार्थ (प्रातिनाधिक छायाचित्र) - Divya Marathi
अंमली पदार्थ (प्रातिनाधिक छायाचित्र)

पुणे- पुणे शहर पोलिस, पुणे लोहमार्ग व पुणे ग्रामीण पोलिस यांच्या कार्यक्षेत्रात जप्त करण्यात अालेल्या एक काेटी 16 लाख 23 हजार रुपयांच्या अंमली पदार्थांचा मुंढवा येथील भारत फोर्ज या कंपनीच्या मेल्टिंग भट्टीत भस्मीकरण करून नष्ट करण्यात अाले. सदरची कार्यवाही पुणे शहरात 28 वर्षात प्रथमच करण्यात अालेली अाहे. 

 

पुणे शहर पोलिस कार्यक्षेत्रातील 562 किलो 160 ग्रॅम गांजा, 352 किलो 832 ग्रॅम गांजा मिक्स तरंग शिवामृत, 11 किलो 250 ग्रॅम गांजा मिक्स फलादी चुर्ण, 44 किलो 400 ग्रॅम भांगयुक्त मॅंगो चुर्ण, 11 किलो 250 ग्रॅम भांग, एक किलो 240 ग्रॅम चरस आदी अंमली पदार्थाचा नाश करण्यात अाला. यावेळी प्रादेशिक न्यायसहायक प्रयाेगशाळेचे सहाय्यक रासायनिक विश्लेषक जितेंद्र जावळे, महाराष्ट्र प्रदुषण मंडळाचे उपप्रादेशिक अधिकारी उपेंद्र कुलकर्णी व दोन पंच उपस्थित होते. 

बातम्या आणखी आहेत...