आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

‘डीएसकें’ची रवानगी खासगी रुग्णालयात; न्यायालयीन कोठडीस मंजुरी

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

पुणे- बांधकाम व्यावसायिक डी. एस. कुलकर्णी व त्यांच्या पत्नी हेमंती यांना रविवारी न्यायालयाने खासगी रुग्णालयात हलवण्याची परवानगी दिली. त्यांची रवानगी पोलिस कोठडीतून न्यायालयीन कोठडीत करण्याचीही मागणी न्यायालयाने मान्य केली आहे.  


कुलकर्णी दांपत्याला शनिवारी पहाटे दिल्लीतून ताब्यात घेतल्यानंतर त्याच दिवशी संध्याकाळी पुण्यात न्यायालयात हजर करण्यात आले. या वेळी न्यायालयाने त्यांना पोलिस कोठडी सुनावली होती. विश्रामबाग पोलिस कोठडीत रवानगी होताच कुलकर्णी यांना चक्कर आल्याने त्यांना तातडीने ससून रुग्णालयातल्या अतिदक्षता विभागात भरती करण्यात आले होते. आता त्यांना खासगी रुग्णालयात हलवले जाईल. शनिवारी रात्री दहा वाजता ‘डीएसकें’ना पोलिस कोठडीत नेण्यात आले. त्यांना कोठडीत जेवण देण्यात आले, पण त्यांनी ते नाकारले. रात्री साडेअकराच्या सुमाराला त्यांना चक्कर आल्याने ते खाली बसले. त्यांचा रक्तदाब वाढल्याने त्यांचे वय लक्षात घेऊन पोलिसांनी त्यांना तातडीने ससून रुग्णालयाच्या अतिदक्षता विभागात नेले. रुग्णालयात आणले तेव्हा ते शुद्धीत नव्हते. त्यांना कृत्रिम श्वासोच्छ्वास देण्यात आला. नंतर त्यांची प्रकृती स्थिर होती. दरम्यान, तपास अधिकाऱ्यांनी ‘डीएसकें’ना न्यायालयीन कोठडीची मागणी कोर्टाकडे केली. त्याच वेळी ‘डीएसकें’च्या वकिलांनी त्यांना खासगी रुग्णालयात हलवण्याची मागणी केली. ती मंजूर झाली.

बातम्या आणखी आहेत...