आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

'घराला घरपण' देणा-या डीएसकेंच्या पुण्यातील अलिशान बंगल्याचा 8 मार्च रोजी लिलाव

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

पुणे- 'घराला घरपण' देणा-या या जाहिरीतीमुळे घराघरात पोहचलेल्या डीएसकेंना आता आपल्या राहता बंगलाही गमवावा लागणार आहे. घेतलेले कर्ज फेडू न शकल्याने डीएसकेंच्या पुण्यातील चतु:श्रृगी भागातील अलिशान बंगल्याचा सेंट्रल बॅंक ऑफ इंडिया या बॅंकेकडून लिलाव होणार आहे. या बंगल्याची बेस प्राईस 66 लाख 39 लाख रूपये ठेवण्यात आली आहे. बॅंककडून या लिलावाबाबत आज वृत्तपत्रात जाहिरात प्रकाशित करण्यात आली आहे.

 

डीएसके यांचा पुण्यातील सेनापटी बापट रोडवर चतु:श्रृगी टेकडीलगत अलिशान बंगला आहे. या बंगल्यावर डीएसकेंनी 100 कोटींहून अधिक कर्ज काढलेले आहे. मागील काही महिन्यांपासून अनेकदा बॅंकेने डीएसकेंकडे कर्जाचे हप्ते भरण्याबाबत विचारणा केली. मात्र, पैसे नसल्याने त्यांनी वारंवार टाळाटाळ केली. अखेर नोटिसकाळ संपल्याने सेट्रंल बॅंकेने लिलावाची प्रक्रिया सुरू केली आहे. आज पेपरमध्ये दिलेल्या जाहिरातीनुसार या बंगल्याची किंमत 66 कोटी 39 लाख रूपये इतकी ठेवण्यात आली आहे. तसेच याचा लिलाव 8 मार्च रोजी ठेवण्यात आला आहे.

 

दरम्यान, एसबीआय बॅंकेनेही पैसे थकल्याने डीएसकेंच्या बालेवाडी येथील जमिनीचा लिलाव करण्याचा निर्णय घेतला आहे.  

बातम्या आणखी आहेत...