आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

डीएसके ठणठणीत, चाैकशी शक्य; डाॅक्टरांचा अहवाल, एक मार्चपर्यंत पाेलिस काेठडी

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

पुणे- ठेवीदारांचे पैसे परत न केल्याप्रकरणी बांधकाम व्यावसायिक डी. एस. कुलकर्णी व हेमंती या दांपत्याच्या काेठडीची मुदत शुक्रवारी संपल्यानंतर न्यायालयाने त्यांची पुन्हा १ मार्चपर्यंत पाेलिस काेठडी वाढवली. विशेष सत्र न्यायाधीश जी. टी. उत्पात यांनी हे अादेश दिले. दरम्यान, ठेवीदारांकडून जमा केलेल्या पैशाची कुलकर्णी दांपत्याने अापल्या कुटुंबीयांतील व्यक्तीच्या नावावरच फिरवाफिरवी केल्याचे पाेलिसांच्या तपासात समाेर अाले अाहे. डीएसके यांच्या वेगवेगळ्या कंपन्यांवर विविध बँकांचे एकूण २८९२ काेटी रुपये कर्ज अाहे.  


डीएसके यांना शुक्रवारी सकाळी दीनानाथ मंगेशकर रुग्णालयातून ससून रुग्णालयात दाखल करण्यात अाले. अाठ डाॅक्टरांच्या समितीने त्यांची तपासणी करून डीएसकेंची प्रकृती ठणठणीत असल्याचा अहवाल दिला अाहे. त्यानुसार पुढील चाैकशीसाठी पाेलिसांनी त्यांना येरवडा मध्यवर्ती कारागृहात हलवण्यात अाले. काेल्हापूर येथील राजापुरी पाेलिस ठाण्यातही डीएसके यांच्याविराेधात गुन्हा दाखल असल्याने त्यांचा ताबा देण्यात यावा असा अर्ज काेल्हापूर पाेलिसांनी पुणे न्यायालयात केला. मात्र, डीएसकेंचा सध्या पुणे पाेलिस तपास करत असल्याने काेल्हापूर पाेलिसांना रिकाम्या हाताने परतावे लागले.    

 

कुलकर्णी कुटुंबातच पैशाची हेराफेरी   

सन २०१० ते २०१७ दरम्यान हेमंती कुलकर्णी यांनी अापला मुलगा शिरीष यांना स्वीकारलेल्या ठेवींतून एकूण १३४ काेटी रुपये वर्ग केल्याचे पाेलिस तपासात निष्पन्न झाले अाहे. तसेच २०१० ते २०१६ या दरम्यान स्वीकारलेल्या ४३८ काेटी रुपये स्वत:चे  बँक खात्यावर हेमंती यांनी वळते केले. यापैकी ३५ काेटी रुपये मुलगा शिरीष याच्या बँक अाॅफ महाराष्ट्र खात्यावर वर्ग करून त्याद्वारे टाकवे (ता. मावळ) जमीन खरेदी केली अाहे. सदरची जमीन शिरीष कुलकर्णी यांनी डीएसके माेटाेव्हील्स या कंपनीला प्रतिमहिना ४८ ललाख रुपये भाड्याने दिली अाहे. तसेच दीपक कुलकर्णी यांचे बँक खात्यावर ९० काेटी रुपये वर्ग करण्यात अाले अाहे. सदर अाराेपीने त्यांच्या इतर भागीदारी कंपन्यांना या कालावधीत एकूण २४ काेटी वर्ग केले असून या सर्व गाेष्टींचा पाेलिसांना तपास करावयाचा अाहे.

बातम्या आणखी आहेत...