आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

डीएसकेंवर मंगेशकर रूग्नालयातच उपचार, प्रतिष्ठेचा मुद्दा न करण्याचा वकीलांना सल्ला

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

पुणे- प्रसिध्द बांधकाम व्यवसायिक डी.एस.कुलकर्णी यांनी गुंतवणुकदारांची फसवणुक केल्याप्रकरणी त्यांना पाेलिसांनी दिल्ली येथून अटक केली अाहे. मात्र, पाेलिस काेठडीत असतानाच त्यांना चक्कर अाल्याने त्यांना उपचाराकरिता न्यायालयाचे परवानगीने दीनानाथ मंगेशकर या खासगी रुग्णालयात हलविण्यात अाले.

 

मंगळवारी सकाळी ससूनच्या मेडिकल बाेर्ड मधील अाठ डाॅक्टरांचे पथकाने त्यांची तपासणी केली. त्यामध्ये डीएसके यांना पुढील 48 तासांकरिता ससून मध्येच ठेवण्याचा निर्णय घेण्यात अाला. मात्र, डीएसके यांच्या वकीलांनी डीएसके यांना काेणत्या रुग्णालयात उपचार घ्यावेत याचे स्वातंत्र्य द्यावे अशी मागणी विशेष न्यायाधीश जी.टी.उत्पात यांच्या न्यायालयात केली. त्यानुसार, न्यायालयाने डीएसके यांना पुढील दाेन दिवस दीनानाथ मंगेाकर रुग्णालयात उपचार घेण्यासाठी परवानगी दिली अाहे.

 

दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाचे संबंधित प्रमुख डाॅक्टर डीएसके व्यवस्थित अाहेत की नाही याबाबतचा अहवाल ससून मेडिकल बाेर्डकडे देतील. 23 फेब्रुवारी राेजी सकाळी नऊ वाजता डीएसके यांची ससून मेडिकल बाेर्ड समाेर पुन्हा तपासणी करण्यात येऊन ते ठणठणीत असल्यास, न्यायालयाची परवानगी घेऊन पाेलीस त्यांचेकडे पुढील चाैकशी करु शकतील.

 

दरम्यान, डीएसके यांचे वैद्यकीय तपासणीकरिता ससूनचे प्रमुख डाॅ.अजय तावरे यांच्या अध्यक्षतेखाली ससून मधील अाठ डाॅक्टरांची मंगळवारी बैठक झाली. त्यानुसार डीएसके यांना ससून रुग्णालयातच उपचारांसाठी दाेन दिवस ठेवण्यात यावे असा निर्णय घेण्यात अाला. दाेन दिवसानंतर त्यांच्या तब्येतीची पुन्हा तपासणी करण्यात येऊन त्याबाबतचा अहवाल न्यायालयात सादर करण्याचे ठरविण्यात अाले. मात्र, डीएसके यांचे वकील श्रीकांत शिवदे यांनी न्यायालयात अर्ज करत, डीएसके यांना दीनानाथलाच ठेवण्यात यावे अशी मागणी केली.

 

सरकारी वकील प्रवीण चव्हाण यांनी युक्तिवाद करताना सांगितले की, डीएसके यांची तब्येत चांगली असून त्यांचा रक्तप्रवाह सुरळित अाहे. डाॅक्टरांनी केवळ त्यांना नियमित व्यायाम, अाहार पालन करण्यास सांगितले अाहे. त्यांची तब्येत गंभीर नसल्याने त्यांच्या जिवाला काेणताही धाेका नाही. ससून मधील सरकारी रुग्णालयात उपचार घ्यावयाचे नाही हा त्यांचा न्यूनगंड चांगला नसून त्याचा समाजात चुकीचा संदेश जाताे.

 

यावर डीएसके यांचे वकील शिवदे प्रतिवाद करताना म्हणाले, डीएसके यांनी काेणत्या रुग्णालयात उपचार घ्यावे याचा त्यांना मूलभूत अधिकार अाहे. त्यांच्या मेंदूमध्ये ब्लाॅक अाढळून अाला असून रक्तपुरवठा याेग्य हाेत नाही. त्यांचे जिवाचे काही बरेवार्इट झाल्यास त्याला ससूनचे डाॅक्टर व तपास अधिकारी जबाबदार राहतील. न्यायालयाने याप्रकरणी रुग्णाने काेणत्या रुग्णालयात रहावे हा प्रतिष्ठेचा मुद्दा न करता, ताे व्यवस्थित झाल्यावर त्याची पाेलीस चाैकशी करण्यात यावी असे सांगितले.

 

पत्नी, मुलाचे पाेलीस तपासात असहकार्य-

 

डीएसके प्रकरणाचा तपास करणारे अार्थिक गुन्हे शाखेचे सहाय्यक पाेलीस अायुक्त निलेश माेरे यांनी सांगितले की, डीएसके यांचे पत्नी हेमंती कुलकर्णी यांच्याकडे पाेलीस चाैकशी करत अाहे. मात्र पाेलीसांच्या प्रश्नांना त्या याेग्यरितीने उत्तरे देत नसून तपासात सहकार्य करत नाही. तर त्यांचा मुलगा शिरीष याला उच्च न्यायालयाने अटकपूर्व जामीन दिला अाहे मात्र, न्यायालयाने त्यास चार दिवस गुन्हे शाखेकडे चाैकशीला हजर राहण्यास सांगितले. त्यानुसार ताे चाैकशीसाठी हजर राहिला मात्र, त्यानेही पाेलीसांना चाैकशीत सहकार्य केलेले नाही. सदर गुन्हयाचे तपासाकरिता पाेलीसांनी नेमलेल्या विशेष लेखा परीक्षकांचा ‘फाॅरेन्सिक अाॅडीट’ अहवाल प्राप्त झाला असून त्याअाधारे पोलीस पुढील तपास करत आहेत. 

बातम्या आणखी आहेत...