आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शिक्षण मंडळाचे ‘ऑनलाइन प्रिपरेशन पोर्टल’; स्पर्धा परीक्षांसाठी विद्यार्थ्यांना उपयुक्त

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

पुणे- स्पर्धात्मक परीक्षांसाठी विद्यार्थ्यांना सराव म्हणून उपयोगी ठरणारे बहुपर्यायी प्रश्नांचे ‘ऑनलाइन प्रिपरेशन पोर्टल’ राज्य शिक्षण मंडळाने कार्यान्वित केले आहे.  Mcqpractice.mh-hsc.ac.in  या संकेतस्थळावर हे पोर्टल विद्यार्थ्यांना पाहता येईल. पोर्टल प्रत्यक्ष कसे वापरायचे, याच्या सविस्तर सूचना पोर्टलवर सुरुवातीलाच देण्यात आल्या आहेत. त्यांचे तंतोतंत पालन केल्यास विद्यार्थी, पालक, शिक्षक सर्वांनाच या सुविधेचा लाभ घेता येईल, अशी माहिती मंडळाचे सचिव कृष्णकुमार पाटील यांनी दिली.    


राज्य शिक्षण मंडळाच्या कार्यकक्षेतील विद्यार्थ्यांना जेईई, एम. एच.टी सीईटी, नीट..आदी स्पर्धात्मक परीक्षांना वेळोवेळी प्रविष्ट व्हावे लागते. या परीक्षांची प्रश्नपद्धती आणि अपेक्षित उत्तरे, रूढ परीक्षांपेक्षा वेगळी असतात. त्यामुळे सरावाअभावी राज्यातील अनेक विद्यार्थ्यांना या परीक्षा कठीण जात होत्या. त्यावर उपाय म्हणून मंडळाने पुढाकार घेऊन विद्यार्थ्यांसाठी हे ऑनलाइन प्रिपरेशन पोर्टल कार्यान्वित केले आहे.

 

> वेबसाइट उघडल्यानंतर विद्यार्थ्यांनी प्रथम स्वत:ची माहिती भरावी   

> त्यानंतर स्वत:चा पासवर्ड क्रिएट करावा   

> मोबाइल क्रमांक आणि पासवर्ड वापरून संकेतस्थळ वापरता येईल .  

> सुरुवातीला प्रत्येक विद्यार्थ्याला प्रत्येक विषयाचे २५ प्रश्न एका दिवशी सोडवता येतील   
> यथावकाश प्रश्नांची संख्या वाढवली जाईल   

> विद्यार्थ्यांनी सोडवलेल्या प्रश्नांची उत्तरे चूक की बरोबर यांची त्वरित संगणकीय नोंद होईल   
विद्यार्थ्यांना ती दाखवली जाईल, चूक उत्तर समजतील. योग्य उत्तरे दिसू शकतील   
प्रतिदिन विद्यार्थ्यांचा वापर आणि प्रगती पाहता येईल  

 

तज्ज्ञांकडून होणार प्रश्नांची तपासणी  
या पोर्टलवर उपलब्ध केलेले प्रश्न प्रत्यक्ष अध्यापन, अध्ययन केलेल्या तज्ज्ञांनी तयार केले आहेत. मंडळाकडील तज्ज्ञांनी या प्रश्नांची तपासणी केली आहे. विषयानुसार घटक – उपघटकनिहाय असेच प्रश्न आहेत. हे प्रश्न फक्त विद्यार्थ्यांच्या सरावासाठी आहेत. परीक्षेत हे प्रश्न येतील, असे नाही.   
- कृष्णकुमार पाटील,  सचिव, राज्य शिक्षण मंडळ

बातम्या आणखी आहेत...