आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दारुच्या नशेत 16 व्या मजल्यावरुन पडून सिंहगड कॉलेजच्या इंजिनिअरींग विद्यार्थ्याचा मृत्यू

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

पुणे- मित्रांसोबत दारु पिण्यास बसले असताना दारुच्या नशेत 16व्या मजल्यावरील फ्लॅटच्या बाल्कनीतून पडून एका तरुणाचा मृत्यू झाल्याची घटना बालेवाडी परिसरात घडली अाहे. अनुपम पाटील (वय- 22, रा. बालेवाडी, पुणे) असे मयत झालेल्या तरुणाचे नाव अाहे.  

 

याप्रकरणी चतुश्रृंगी पाेलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात अाला अाहे. रविवारी मध्यरात्री अनुपम पाटील हा त्याच्या तीन मित्रांसमवेत बालेवाडी येथील 43 प्रायव्हेट या टाेलेजंग इमारतीच्या 16 व्या मजल्यावर दारु पित बसला हाेता. दारु पिल्यानंतर फ्लॅटच्या बाल्कनीतून शिडीवर चढताना दारुच्या नशेत असलेल्या अनुपम याचा ताेल जाऊन ताे थेट खाली पडला व त्याचा जागीच मृत्यू झाला.

 

अनुपम हा सिंहगड महाविद्यालयात अाभियांत्रिकीच्या शेवटच्या वर्षात शिक्षण घेत हाेता. पाेलिसांना घटनेची माहिती मिळताच, चतुश्रृंगी पाेलिस घटनास्थळी दाखल झाले त्यांनी अनुपम पाटील यांचा मृतदेह ताब्यात घेऊन, शवविच्छेदनाकरिता ससून रुगणालयात पाठविला. 

बातम्या आणखी आहेत...