आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कॉल सेंटरच्या माध्यमातून 11 हजार अमेरिकन नागरिकांची फसवणूक, छाप्यात तिघांना अटक

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
फसवणूक प्रकरणी तीन जणांना अटक केली असून, त्यांचे चार साथीदार पसार झाले आहेत. (सिंबॉलिक फोटो) - Divya Marathi
फसवणूक प्रकरणी तीन जणांना अटक केली असून, त्यांचे चार साथीदार पसार झाले आहेत. (सिंबॉलिक फोटो)

पुणे- अमेरिकन अार.अार.एस अधिकारी व बॅंक वित्तीय अधिकारी बाेलत असल्याचे भासवून अमेरिकन नागरिकांना फसवणा-या काॅलसेंटरवर पुणे सायबर सेलच्या पथकाने छापा टाकून तिघांना अटक केली अाहे. सदर अाराेपींनी अात्तापर्यंत सुमारे 11 हजार 125 नागरिकांची फसवणूक केल्याची माहिती सायबर गुन्हे शाखेचे पाेलीस उपअायुक्त सुधीर हिरेमठ यांनी दिली अाहे. 

 

शिवक प्रितमदा लधानी (वय- 29, रा. धानाेरी, पुणे), प्रतिक सुभाषचंद्र पांचाल (30, रा. काेरेगाव पार्क, पुणे) व शेरल शतिषभाई ठाकर (33, रा. पुणे) अशी याप्रकरणी अटक करण्यात अालेल्या अाराेपींची नावे अाहेत. त्यांचे चार साथीदार पसार असून पाेलिस त्यांचा शाेध घेत अाहे. 


पुणे सायबर क्राईम सेलला माहिती मिळाली हाेती की, काेरेगाव पार्क येथे उच्चभ्रू भागात नाईट काॅल सेंटर असून ते काॅल सेंटरद्वारे अमेरिकेतील नागरिकांना फसवत अाहेत. त्यानुसार पाेलिसांनी काेरेगाव पार्कमधील पिनॅकल इमारतीत दुसऱ्या मजल्यावरील काॅल सेंटरवर छापा टाकून काॅल सेंटर चालविणाऱ्या तीन जणांना अटक केली. अाराेपींच्या ताब्यातून एक लॅपटाॅप, अाठ संगणक हार्डडिस्क, तीन माेबाईल, 8 हेडफाेन व इतर महत्वाचे कागदपत्रे जप्त करण्यात अाले अाहे. 

 

नागरिकांना घाबरवून पैसे उकळायचे अाराेपी-

 

सायबर क्राइम सेलचे पाेलिस निरीक्षक गजानन पवार म्हणाले, छापा घातल्यानंतर दिसून अाले की अमेरिकन नागरिकांचे नाव, संपर्क क्रमांक, पत्ता व ईमेलअायडी इत्यादीची माहिती अाराेपींना अाॅनलाइन प्राप्त हाेत अाहे. सदर माहितीच्या अाधारे अाराेपी त्या नागरिकांना बल्क व्हाईस मेल पाठवित असत. त्यानंतर अमेरिकन नागरिकांनी परत काॅल केल्यास अाराेपी अमेरिकन नागरिकांना काॅलवर ते अाय.अार.एस अधिकारी असल्याचे सांगून त्यांचा टॅक्स भरणे बाकी अाहे असे सांगतात.

 

टॅक्स न भरल्यास सहा वर्ष शिक्षा व मालमत्ता जप्त केली जाईल अशी धमकी दिली जात. त्यामुळे समाेरील नागरिक घाबरुन तडजाेडीअंती विचारतात, तेव्हा त्यांना जवळच्या शाॅप मधून वेगवेगळया किंमतीचे अायटयुन, वाॅलमार्ट, बेस्टबाय, टारगेट गिफ्ट व्हावचर खरेदी करण्यास सांगून ताे व्हाऊचर नंबर त्यांचेकडून घेतला जाताे. सदरचा नंबर पुढे गुजरातला पाठविला जाताे व त्यानंतर त्याचे भारतीय चलनात रुपांतर करत असत.

 

डिसेंबर 2017 पुर्वी पेडे बॅंक लाेन करुन देण्यासाठी बॅंकेचे वित्तीय अधिकारी बाेलत अाहे असे सांगून अमेरिकन नागरिकांची बॅंक प्राेसेसिंग फी म्हणून 500 ते 1000 डाॅलरचे गिफ्ट व्हाऊचर खरेदी करण्यास सांगून त्यांची फसवणुक केली जात हाेती व त्यांना कुठल्याही प्रकारचे लाेन दिले जात नव्हते. 

बातम्या आणखी आहेत...