आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

महिला संगणक अभियंत्याची 12व्‍या मजल्यावरून उडी घेऊन आत्महत्या

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

पिंपरी-चिंचवड- पिंपरी-चिंचवड मधील काळेवाडी येथे संगणक अभियंता महिलेने १२ मजल्यावरून आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. ही घटना शुक्रवारी पाच वाजेच्या सुमारास घडली. पल्लवी उदयन मुजुमदार असे या महिलेचे नाव आहे. आत्महत्याचे कारण अद्याप अस्पष्ट आहे. 


पोलिसांनी दिलेल्या माहिती नुसार, संगणक अभियंता पल्लवी उदयन मुजुमदार ( वय-३० रा.पार्कस्ट्रीट काळेवाडी ) या आज ( शुक्रवारी ) दुपारी आपल्या एका वर्ष्याच्या मुलाला रुग्णालयात घेऊन गेल्या होत्या. घरी परतल्‍यानंतर काही वेळाने वसाहतीच्या बाजूच्या इमारतीच्या १२ मजल्यावरील गरबेज टाकण्यासाठी असलेल्या डक्ट मधून त्‍यांनी उडी घेतली, यात त्‍या गंभीर जखमी झाल्या. त्‍यांना तातडीने खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले, मात्र उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यू झाला. मयत पल्लवी या हिंजवडी येथील खाजगी कंपनीत संगणक अभियंता म्हणून काम करत होत्या. त्याचबरोबर त्यांचे पती देखील संगणक अभियंता आहेत. अद्याप आत्महत्याचे कारण अस्पष्ट आहे. अधिक तपास वाकड पोलीस करत आहेत.

बातम्या आणखी आहेत...