आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पुण्यात गोदामाला आग लागल्यानंतर डालडा वितळून रस्त्यावर, दुचाकीस्वारांची तारांबळ

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

पुणे- पिंपरी-चिंचवड येथील काळभोर नगर येथे डालडा (वनस्पती तूप) असलेल्या गोदामाला भीषण आग लागली होती. ही घटना सकाळी 10 च्या सुमारास शॉर्ट सर्किटमुळे लागल्याची माहिती अग्निशमन दलाच्या जवानांनी दिली आहे. तर दुसऱ्या घटनेत काळेवाडी ते पिंपळे गुरव या 7 किलोमीटरच्या रस्त्यावर ऑइल सांडले होते. यामुळे दुचाकी घसरत होत्या, तो रस्ता अग्निशमन दलाच्या जवानांनी पाण्याच्या फवाऱ्याने साफ केला.

 

 

अग्निशमन दलाच्या जवानांनी दिलेल्या माहितीनुसार, काळभोरनगर येथे सकाळी दहाच्या सुमारास डालड्याचे पॅकेट असलेल्या गोदामाला भीषण आग लागली होती. यात डालड्याचे 300 बॉक्स आगीत वितळल्याने अर्धा किलोमीटरपर्यंत रस्त्यावर डालडा पसरला होता. यामुळे जवानांचे पाय घसरत होते. अग्निशमन दलाच्या जवानांनी एका तासानंतर आगीवर नियंत्रण आणले. मात्र ते साफ करत असताना अग्निशमन दलाच्या जवानांची दमछाक झाली. ही आग शॉर्टसर्किटमुळे लागली. ही आग विझवण्यासाठी प्राधिकरण येथील एक आणि संत तुकाराम नगर येथील अग्निशमन दलाच्या दोन गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या होत्या. प्रताप चव्हाण, अशोक कानडे, प्रतीक कांबळे,  मुकेश बर्वे, भूषण येवले, विघ्नेश वाटकरे, काशीनाथ ठाकरे, विशाल जाधव, वाहनचालक विशाल लाडके आदींनी यांनी आगीवर नियंत्रण आणले.

 

 

तर दुसऱ्या घटनेत रस्त्यावर तब्बल सात किलोमीटर हायड्रॉलिक ऑइल सांडले होते. त्यामुळे अनके दुचाकी घसरल्या मात्र यात कोणालाही दुखापत झालेली नाही.या घटनेची माहिती राहटणी अग्निशमन दलाला मिळताच चेतन माने, अनिल माने, सुशीलकुमार राणे, चिपळूणकर अमोल, प्रदीप हिले यांनी तातडीने येऊन सात किलोमीटरपर्यंत सांडलेले ऑइल पाण्याच्या फवाऱ्याने साफ केले.

 

 

पुढील स्लाईडवर आणखी फोटो आणि माहिती

बातम्या आणखी आहेत...